दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर

अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएलाला डेट करतोय. हे दोघं लिव्ह इनमध्ये राहत असून त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. तरीही लग्न का करत नाही, असा प्रश्न त्याला विचारला गेला.

दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर
अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 10:33 AM

अभिनेता अर्जुन रामपालने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नी मेहर जेसियाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांना आरिक आणि आरव ही दोन मुलंसुद्धा आहेत. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न केलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. “एकत्र मुलंबाळं असताना, एक कुटुंब म्हणून एकत्र राहत असतानाही लग्न का नाही केलं”, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर अर्जुन रामपालने मुलाखतकर्त्याला प्रतिप्रश्न केला, “लग्न म्हणजे काय?”

‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट मुलाखतीत अर्जुनने पुढे समजावून सांगितलं की लग्न हे लोकांना बदलू शकतं. “हे मी नाही किंवा ती नाही. पण लग्न म्हणजे काय? शेवटी तो कागदाचा एक तुकडाच. माझ्या मते आम्ही आधीच विवाहित आहोत आणि माझ्या मनात त्याविषयी कोणताच संभ्रम नाही. पण कधीकधी तो कागदाचा एक तुकडासुद्धा तुम्हाला बदलू शकतो. कारण त्यामुळे तुम्हाला ते पर्मनंट वाटू लागतं. पण ही कल्पनाच खोटी आहे. तुम्ही फक्त कायद्याने बांधिल असता”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

लग्न हे लोकांची एकमेकांबद्दलची वृत्ती बदलवू शकते, असं मत अर्जुनने मांडलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “तुमची एकमेकांबद्दलची वृत्ती ही लग्न बदलवू शकते. आम्हाला दोघांना तरी हेच वाटतं. आम्हा दोघांमध्ये जे काही घडलं, ते नैसर्गिकरित्या घडलं. मला त्याविषयी अधिक बोलायचं नाही, कारण उगाच त्याला नजर लागेल. मला असं वाटत नाही की मी कोणाला स्पष्टीकरण द्यायला बांधिल आहे. आमच्यासाठी हे नातं सुंदर आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता, तोपर्यंत घेत राहा. आम्ही दोघांनी मनाने एकमेकांशी लग्न केलंय. आम्ही दोघं एकमेकांना योग्य दिशेने पुढे नेतोय आणि त्याचवेळी आम्ही एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहोत.”

लग्नाच्या बाबतीत विचार वेगळे असले तरी लग्नसंस्थेच्या विरोधात नसल्याचं अर्जुन रामपालने या मुलाखतीत स्पष्ट केलं. “मी कोणालाही लग्न न करण्याचा सल्ला देत नाहीये किंवा मी कोणाला लग्नसंस्थेविरोधात जाण्याचा सल्ला देत नाहीये. कदाचित भविष्यात आम्ही लग्नसुद्धा करू. पण सध्या त्याविषयी काहीच सांगू शकत नाही. भविष्यात काय होईल, हे कोणालाच माहीत नाही”, असं तो म्हणाला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.