Aroh Welankar: ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’; एकनाथ शिंदेंबाबत आरोह वेलकरणचं ट्विट चर्चेत
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा गट असल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. सरकारच्या बहुमताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या बहुमताबाबत भाजप प्रश्न उपस्थित करत अविश्वास ठराव आणणार की आणखी कोणती रणनीती आखणार यावर राज्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत (Shivsena) नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारलं. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’, असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी आपण हिंदुत्वासाठी बंडाचा झेंडा घेतल्याचं सूचित केलं. मंगळवारी त्यांचं हे ट्विट क्षणार्धात व्हायरल झालं. याच ट्विटवर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असं ट्विट आरोहने शिंदेंच्या ट्विटवर केलं.
मंगळवारपासून होत असलेल्या राजकीय घडामोडींवर आरोहने विविध ट्विट केले आहेत. ‘संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकार नावाचा भव्य, गोंधळलेला आणि लाजिरवाणा कारभार पहावा’, असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. आणखी एका ट्विटमध्ये त्याने लिहिलं, ‘महाराष्ट्रातील एकूण 50 आमदार आता गुवाहाटी इथं उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मला वाटतं की आत महाविकास आघाडीची वेळ आली आहे. लेट्स वेट अँड वॉच.’
आरोह वेलणकरचे ट्विट्स-
परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं. ?? https://t.co/Y0xRK8xSdl
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022
The entire state and voters of #Maharashtra should watch the grand, confused and shameful chaos that is called- महाविकासआघाडी सरकार! ??♂️
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 21, 2022
Total 50 MLA’s from #Maharashtra expected to be present at Guwahati now. I think its time up for MVA. Lets wait and watch.
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 22, 2022
एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांनी बंड पुकारल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मंगळवारी शिवसेना भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे हे गेली साडेसात वर्षे मंत्रिपदी आहेत. ठाणे जिल्ह्यात पक्षांतर्गत कारभारात त्यांना मुक्त वाव आहे. मग शिंदे नाराज कसे, असा सवाल कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. दुसरीकडे आघाडी सरकारला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ पक्षनेत्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा गट असल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. सरकारच्या बहुमताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या बहुमताबाबत भाजप प्रश्न उपस्थित करत अविश्वास ठराव आणणार की आणखी कोणती रणनीती आखणार यावर राज्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.