AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi यांची पहिली पत्नी अडकणार विवाहबंधनात! अखेर सत्य समोर

घटस्फोटानंतर वयाच्या ५७ व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी बांधली लग्नगाठ; अभिनेत्याची पहिली पत्नी देखील करणार दुसरं लग्न! अखेर सत्य समोर

Ashish Vidyarthi यांची पहिली पत्नी अडकणार विवाहबंधनात! अखेर सत्य समोर
पिलू विद्यार्थी, आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नी
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 2:41 PM

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शिवाय आशिष विद्यार्थी यांची पहिल्या पत्नी राजोशी बरुआ यांनी देखील अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशिष चौधरी आणि त्यांच्या खासगी आयु्ष्याबद्दल चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, दुसऱ्या लग्नानंतर आशिष चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. नुकताच झालेल्या मुलाखतीत राजोशी बरुआ यांनी आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं.

पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल राजोशी म्हणाल्या, ‘आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माला काहीही अडचण नाही. आशिष एक उत्तम व्यक्ती आहेत. गेल्या दोन वर्षात गोष्टी आम्हाला हव्या होत्या तशा घडत नव्हत्या.. म्हणून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला..’ एवढंच नाही तर, आशिष विद्यार्थी यांनी देखील पहिल्या पत्नीसोबत २२ वर्ष आनंदात व्यतीत केले.. असं सांगितलं.

मुलाखतीत राजोशी यांना, ‘पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर तुम्ही देखील पुन्हा संसार थाटणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राजोशी म्हणाल्या, ‘सध्या माझं उत्तर नाही आहे.. मी लग्न नाही करणार, पण घटस्फोटानंतर आशिष यांना पत्नीची गरज होती…’ पहिल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल राजोशी म्हणाल्या, ‘माझ्या मनात कोणत्याही गोष्टीची हरकत नाही.’

हे सुद्धा वाचा

राजोशी पुढे म्हणाल्या, ‘घटस्फोटानंतर त्यांची दुसरं लग्न करण्याची इच्छा असेल आणि त्यांनी दुसरं लग्न केलं यामध्ये मला कोणता गुन्हा वाटत नाही. व्यक्ती वयाच्या २१ व्या वर्षीच नाही तर, ६० व्या वर्षी देखील विवाहबंधनात अडकू शकतो.. त्यात काहीही वाईट नाही… ‘ असं देखील आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नी राजोशी बरुआ म्हणाल्या..

पहिल्या लग्नाबद्दल आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘प्रत्येकाला आनंदाने जगाचं आहे. २२ वर्षांपूर्वी माझ्या आयु्ष्यात राजोशी बरुआ आली.. पती-पत्नी म्हणून आम्ही आनंदी होतो.. पण गेल्या दोन वर्षांमध्ये आम्हाला चित्र वेगळं दिसू लागलं… आम्हाला वाटत होतं तसं भविष्य आम्हाला दिसत नव्हतं. नात्यात आलेले उतार – चढाव दूर होवू शकतात. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले. पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही सोबत राहिलो असतो पण खासगी आयुष्यात मात्र दुःखी असतो. ही गोष्ट आम्हाला नको होती..’ आज आशिष विद्यार्थी आणि राजोशी बरुआ त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.