Ashish Vidyarthi | ‘ती फक्त माझ्या मुलाची आई..’; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त

आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केले होते. या पोस्टमधून त्यांनी आशिष यांना टोमणा मारल्याचा आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी दु:ख व्यक्त केल्याचा अर्थ नेटकऱ्यांनी काढला होता.

Ashish Vidyarthi | 'ती फक्त माझ्या मुलाची आई..'; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त
पिलू विद्यार्थी, आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नी
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 9:58 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआ यांच्याशी दुसरं लग्न केलं. 25 मे रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. याआधी त्यांनी अभिनेत्री राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांचीच चर्चा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशिष यांनी रुपाली यांच्यासोबत पहिली भेट कशी झाली आणि दुसऱ्या लग्नाच्या निर्णयानंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

रुपाली यांच्याशी पहिली भेट कशी झाली?

“पिलूशी घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर माझ्या एका व्लॉगिंगच्या असाइनमेंटदरम्यान रुपालीशी पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत आमची चांगली मैत्री झाली. रुपालीने तिच्या आयुष्यातील दु:ख माझ्यासमोर मांडलं. पाच वर्षांपूर्वी तिने तिच्या पतीला गमावलं होतं. मात्र त्यानंतर तिने लग्नाचा कधी विचार केला नव्हता. पण जसजसं आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, तसतसं जाणवलं की रुपाली तिच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीकोनातून बघू शकते आणि पुन्हा एकदा लग्नाचा विचार करू शकते. ती 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांचा आहे. आम्ही लग्न का करू नये? वय आणि इतर गोष्टींचा विचार न करता आपण सर्वजण खुश राहू शकतो. आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे हेच माझ्या आयुष्यातील मुख्य उद्दिष्ट आहे आणि तीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या लग्नानंतर कुटुंबातील वातावरण

आशिष यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीयांवर काय परिणाम झाला याबद्दलही ते व्यक्त झाले. ते पुढे म्हणाले, “पिलू आणि माझ्या लग्नाच्या बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत, ज्या आम्ही एकमेकांच्या मनात कायम जपून ठेवणार आहोत. पिलू ही फक्त माझ्या मुलाची आई आहे, असं मी तिला कधीच समजलो नाही. पिलू ही माझी मैत्रीण आहे, ती माझी पत्नी होती. हे सर्व कोणत्याही दु:खाशिवाय झालं असं कृपया समजू नका. एका व्यक्तीपासून विभक्त होणं हे नेहमी दु:खदायकच असतं. ती संपूर्ण प्रक्रिया खूप कठीण असते. पिलू आणि मी या दु:खातून गेलो आहोत. पण अखेर हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला त्या दु:खासोबत जगायचं आहे की त्यातून पुढे जायचं आहे. आयुष्य हे असंच असतं.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.