Ashish Vidyarthi | ‘कुछ तो शरम..’; दुसरं लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्याची टीका

आशिष यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यापैकी बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता दुसऱ्या लग्नानंतर सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर 'रिअल लाइफ विलेन' म्हणूनही टीका करत आहेत.

Ashish Vidyarthi | 'कुछ तो शरम..'; दुसरं लग्न करणाऱ्या आशिष विद्यार्थी यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्याची टीका
Ashish Vidyarthi's second marriageImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 12:56 PM

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. आशिष यांनी अभिनेत्री राजोशी बरुआ यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना 23 वर्षांचा मुलगा आहे. आता रुपाली बरुआशी त्यांनी दुसरं लग्न केलं आहे. एकीकडे काही जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे काही जण त्यांना ट्रोलसुद्धा करत आहेत. यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याचाही समावेश आहे. ‘थोडीतरी लाज बाळगा’ असं त्या अभिनेत्याने ट्विट करत आशिष यांना सुनावलं आहे.

आशिष यांच्यावर दुसऱ्या लग्नावरून टीका करणारा हा बॉलिवूड अभिनेता दुसरा – तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर आशिष यांचा दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्याने लिहिलं आहे, ’60 वर्षांचे अभिनेते आशिष विद्यार्थी यांना शुभेच्छा, ज्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. थोडीतरी लाज बाळगली असती भाईसाहब.’ त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या ट्विटवरून केआरकेलाही ट्रोल केलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘तुम्हाला खूपच ईर्षा होतेय वाटतं. देशद्रोही चित्रपट बनवताना थोडीतरी लाज बाळगली असती’, अशा शब्दांत एका युजरने केआरकेवर निशाणा साधला. तर काहींनी कमेंट बॉक्समध्ये हे स्पष्ट केलं की आशिष यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. सोशल मीडियावर आशिष यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असले तरी त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्रामवर अद्याप कोणताही फोटो पोस्ट केला नाही. त्यामुळे आशिष यांच्या जुन्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकरी लग्नाबाबत कमेंट्स करत आहेत.

आशिष यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यापैकी बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता दुसऱ्या लग्नानंतर सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर ‘रिअल लाइफ विलेन’ म्हणूनही टीका करत आहेत. आशिष यांनी 25 मे रोजी रुपालीशी कोर्ट मॅरेज केलं. यावेळी दोघांचे कुटुंबीय आणि मोजके मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

आशिष यांची दुसरी पत्नी रुपाली या गुवाहाटीच्या असून उद्योजिका आहेत. कोलकातामधील फॅशन इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. एका फॅशन शूटदरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. शूटनंतर दोघांनी एकमेकांकडून मोबाइल नंबर घेतला आणि त्यांचा संपर्क सुरू झाला. चांगली मैत्री झाल्यानंतर आशिष आणि रुपाली हे एकमेकांना डेट करू लागले होते. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी अखेर 25 मे रोजी लग्नगाठ बांधली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.