AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Riaz | बिग बॉसच्या ट्रॉफीबाबत तीन वर्षांनंतर असिम रियाजची नाराजी समोर; सिद्धार्थ शुक्लाचे चाहते भडकले

तेराव्या सिझनमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला विजेता ठरला होता आणि असिम रियाज या शोचा रनर अप बनला होता. हा सिझन पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे गायक, रॅपर आणि मॉडेल असिम रियाजने आता तीन वर्षांनंतर त्याविषयी मौन सोडलं आहे.

Asim Riaz | बिग बॉसच्या ट्रॉफीबाबत तीन वर्षांनंतर असिम रियाजची नाराजी समोर; सिद्धार्थ शुक्लाचे चाहते भडकले
Asim Riaz and Sidharth ShuklaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:31 AM

मुंबई : बिग बॉसला असंच वादग्रस्त रिॲलिटी शो म्हटलं जात नाही. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये कोणता ना कोणता वाद झालाच आहे. तुम्ही कोणताही सिझन पाहिलात तरी त्यातील स्पर्धक किंवा विजेत्यावरून वाद झाला नाही, असं शक्य नाही. बिग बॉसचा सोळावा सिझन नुकताच संपला आणि रॅपर एमसी स्टॅनने विजेतेपदावर नाव कोरलं. मात्र त्याच्याही विजयावर काही जणांकडून टीका होतेय. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्येही असंच काहीसं पहायला मिळालं होतं. तेराव्या सिझनमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला विजेता ठरला होता आणि असिम रियाज या शोचा रनर अप बनला होता. हा सिझन पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे गायक, रॅपर आणि मॉडेल असिम रियाजने आता तीन वर्षांनंतर त्याविषयी मौन सोडलं आहे. त्याने सिद्धार्थचं विजयी होणं हे निर्मात्यांचं ‘सेट अप’ असल्याचं म्हटलंय.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत असिमने त्याच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य केलं. यावेळी त्याने बिग बॉसचा अनुभव सांगितला. सुरुवातीला त्याला बिग बॉसमधून रिजेक्ट करण्यात आलं होतं. मात्र जेव्हा त्याने घरी जाण्यासाठी बॅग पॅक केला, तेव्हा बिग बॉसने त्याला बोलावलं. “माझ्यावेळी त्यांनी काय केलं? मी जिंकावं अशी त्यांची इच्छा नव्हती. आज आपण ऑनलाइन वोटिंग सुरू केली 15 मिनिटांसाठी, आणि म्हटलं जिंकवा ज्याला जिंकवायचं आहे. अरे यार, फक्त इतकं म्हणा ना की तुम्हाला मला जिंकू द्यायचं नव्हतं. तुम्ही हे इतकं स्पष्ट केलं होतं की आम्हाला त्यावर विश्वास बसला की मी त्याबाबत खुश आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

असिमच्या या प्रतिक्रियेवर सिद्धार्थ शुक्लाचे चाहते नाराज झाले आहेत. इतकी वर्षे झाल्यानंतरही असिम त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकला नाही, अशी टीका नेटकरी करत आहेत. ‘हा आजसुद्धा तिथेच अडकला आहे, म्हणून आयुष्यात पुढे काय करू शकत नाहीये’, असं एकाने म्हटलंय. तर ‘सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट विजेता आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘सिद्धार्थ हाच खरा विजेता होता आणि आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

असिम रियाजला बिग बॉसमुळे घराघरात प्रसिद्धी मिळाली. जॉन सीना या हॉलिवूड स्टारनेही त्याचं समर्थन केलं होतं. मात्र तो विजेता ठरला नाही. बिग बॉस 13 मधून बाहेर पडल्यानंतर तो बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला. त्याचा भाऊ उमर रियाज बिग बॉस 15 मध्ये दिसला होता. आता एकता कपूरचा शो ‘लॉक अप सिझन 2’साठी त्याचं नाव समोर येत आहे.

ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट, 8647 कोड जारी... नेमका अर्थ काय
ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट, 8647 कोड जारी... नेमका अर्थ काय.
केलार आणि त्रालच्या दहशतवादी कारवायांबद्दल सैन्यदलाची पत्रकार परिषद
केलार आणि त्रालच्या दहशतवादी कारवायांबद्दल सैन्यदलाची पत्रकार परिषद.
पाकिस्तानी वृत्तपत्राकडून शाहबाज शरीफची पोलखोल, 'ते' दावे सपशेल फेक
पाकिस्तानी वृत्तपत्राकडून शाहबाज शरीफची पोलखोल, 'ते' दावे सपशेल फेक.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर अ‍ॅपल कंपनीची प्रतिक्रिया
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर अ‍ॅपल कंपनीची प्रतिक्रिया.
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.