‘सोढी’ला मिळाले नाहीत त्याच्या मेहनतीचे पैसे? अखेर असित कुमार मोदी यांच्याकडून मोठा खुलासा, आर्थिक तंगी आणि..
अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून मोठी खळबळ ही बघायला मिळत आहे. हेच नाही तर आठ दिवसांपेक्षाही अधिक काळ गुरुचरण सिंग हा बेपत्ता होऊन झालाय. परंतू अजूनही अभिनेत्याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाहीये. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.
तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून मोठी खळबळ बघायला मिळत आहे. आता गुरुचरण सिंग याला बेपत्ता होऊन आठ दिवसांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. मात्र, अजूनही पोलिसांच्या हाती काहीही लागले नसल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. गुरुचरण सिंग याचे अपहरण झाल्याची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. गुरुचरण सिंग याच्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. या प्रकरणात काही मोठे खुलासे होऊ शकतात.
गुरुचरण सिंग हा दिल्लीवरून मुंबईला 22 एप्रिलला निघाला होता. मात्र, तो विमानतळापर्यंतही पोहचला नाही. शेवटी गुरुचरण सिंग हा दिल्लीच्या पालम परिसरात दिसला. आता नुकताच गुरुचरण सिंग याच्याबद्दल मोठा खुलासा तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी केला आहे. आता असित कुमार मोदी यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
असित कुमार मोदी म्हणाले की, हे खरोखरच हैराण करणारे आहे. गुरुचरण सिंग हा आपल्या कुटुंबावर खूप जास्त प्रेम करतो. गुरुचरण सिंग याने मालिका सोडल्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. आई वडिलांची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. कोरोनाच्या काळातच गुरुचरण सिंग याने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडली.
मालिका सोडूनही आमच्यामधील संबंध खूप चांगले होते. जेंव्हाही गुरुचरण सिंगला भेटलो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असायची. आता फक्त देवाकडे हीच प्रार्थना आहे की, सर्वकाही व्यवस्थित असावे आणि त्याने आपला फोन उचलावा. एक चर्चा रंगत आहे की, असित कुमार मोदी यांनी गुरुचरण सिंग याचे कामाचे पैसे दिले नाहीत, आता त्यावर बोलताना देखील असित कुमार मोदी दिसले.
असित कुमार मोदी म्हणाले, असे अजिबातच नाहीये. गुरुचरण सिंगला त्याचे पूर्ण पैसे दिले आहेत. काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले की, गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत होता. मात्र, त्यावर काही खुलासा अजूनही होऊ शकला नाही. गुरुचरण सिंग याने मोठा काळ तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गाजवला आहे. गुरुचरण सिंगची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.