TMKOC Controversy | असित मोदीने शैलेश लोढाचा दावा खोडला, थेट म्हणाले, हे सर्वकाही खोटे, कोर्टाने कधीच…
गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी मोठ्या वादात सापडले आहेत.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन (Entertainment) करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका घरातील सर्वच सदस्यांची आवडती मालिका आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमधील टप्पू सेना हा लहान मुलांचा अत्यंत आवडतीचा विषय आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मालिकेच्या कलाकारांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही देखील बघायला मिळते.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा चाहता वर्ग फक्त देशातच नाही तर विदेशात देखील आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडलीये. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर सतत गंभीर आरोप हे केले जात आहेत.
असित कुमार मोदी यांच्यावर होत असलेले गंभीर आरोप पाहून त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गेल्या 14 वर्षांपासून तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच मालिकेला कायमच रामराम केला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडल्यानंतर शैलेश लोढा यांनी मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर काही आरोप केले. असित कुमार मोदी यांनी आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसे न दिल्याचे आरोप शैलेश लोढा यांनी केले. इतकेच नाही तर हा वाद सतत वाढताना देखील दिसला.
शैलेश लोढा आणि असित कुमार मोदी यांचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले. असित कुमार मोदी यांच्या विरोधात शैलेश लोढा यांनी थेट कोर्टात धाव घेतली. काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगत होती की, शैलेश लोढा हे कोर्टामध्ये त्यांची केस जिंकले आहेत. आता यावर स्वत: असित कुमार मोदी यांनी भाष्य केले आहे.
असित कुमार मोदी म्हणाले की, चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. मुळात म्हणजे शैलेश लोढाच्या प्रकरणात कोर्टाने सहमती प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे. यामुळेच कोर्टामध्ये शैलेश लोढा केस जिंकले हे म्हणणे चुकीचे आहे. शैलेश लोढा आणि आम्ही एक कुटुंब म्हणून एकसोबत होतो, 14 वर्षे सोबत काम केले. मात्र, आता शैलेश लोढाचे वागणे खरोखरच आमच्यासाठी हैराण करणारे आहे. खोट्या गोष्टी त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. असित मोदी यांनी काही आरोप देखील यावेळी केले आहेत.