Photo: अथिया शेट्टीने दाखवली लेकीची झलक? फोटोची सोशल मीडियावर चर्चा
नुकताच अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांच्या लेकीची झलक दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर या कपलचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या लेकीचा चेहरा दिसत आहे. पण हा फोटो खरा आहे की AIच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती माहिती
अथिया शेट्टी आणि केएल राहुलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी झाल्याची घोषणा केली. ‘सर्वांच्या आशिर्वादाने आम्हाला २४ मार्च २०२५ रोजी मुलगी झाली. अथिया आणि केएल राहुल’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच दोन राजहंस दाखवले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. चाहत्यांनी कमेंट करत या दोघांना शुभेच्छा दिल्या होता.





Athiya Shetty
काय आहे व्हायरल फोटो मागचे सत्य
आता सोशल मीडियावर केएल राहुल आणि अथियाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अथिया आणि केएल राहुलने लेकीला घेतले आहे. तिघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. फोटोमध्ये एक आनंदी कुटुंबीय दिसत आहे. पण हा फोटो खरा नाही. AIचा वापर करून हा फोटो तयार करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोकडे पाहिले तर तो खरा फोटो वाटत आहे. पण ही एआयची जादू आहे. आता चाहते अथिया आणि केएल राहुलच्या लेकीची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
दोन वर्षांपूर्वी केलेले लग्न
अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे गेल्या काही वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील व सिनेइंडस्ट्रीतील काही मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिने आई होणार असल्याचे सांगितले होते.