Athiya Shetty KL Rahul | केएल राहुलच्या स्ट्रिप क्बल व्हिडीओवर अखेर अथियाने सोडलं मौन, म्हणाली..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये केएल राहुलला अथियासोबत एका क्लबमध्ये एंजॉय करताना पाहिलं गेलं. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये एक परदेशी डान्सर तोकड्या कपड्यांमध्ये दिसते तर केएल राहुल गाण्यांवर थिरकताना दिसतो.

Athiya Shetty KL Rahul | केएल राहुलच्या स्ट्रिप क्बल व्हिडीओवर अखेर अथियाने सोडलं मौन, म्हणाली..
Athiya and KL RahulImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 8:52 AM

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि तिचा पती क्रिकेटर केएल राहुल यांना एका स्ट्रिप क्बलमध्ये पाहिलं गेल्याचा दावा करण्यात आला. त्यावर आता अथियाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. केएल राहुल सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि काही आठवड्यांपूर्वी त्याच्यावर आयपीएल 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा लंडनमधील एका क्लबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. केएल राहुल आणि अथिया हे एका स्ट्रिप क्बलमध्ये गेले होते, असा दावा काही नेटकऱ्यांनी केला. या सर्व चर्चांदरम्यान आता अथियाने स्पष्टीकरण दिलं आहे.

अथियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मी सहसा अशा गोष्टींवर मौन बाळगणं पसंत करते आणि त्यावर प्रतिक्रिया देत नाही. पण कधी कधी स्वत:साठी उभं राहणं खूप गरजेचं असतं. राहुल, मी आणि आमचे काही मित्र एका रेग्युलर ठिकाणी गेलो होतो, जिथे सर्वसामान्य लोक नेहमी जातात. त्यामुळे गोष्टींना संदर्भापलीकडे खेचणं बंद करा आणि तथ्यांची पडताळणी केल्यानंतरच टीका करा. शांती आणि प्रेम.’

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये केएल राहुलला अथियासोबत एका क्लबमध्ये एंजॉय करताना पाहिलं गेलं. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये एक परदेशी डान्सर तोकड्या कपड्यांमध्ये दिसते तर केएल राहुल गाण्यांवर थिरकताना दिसतो. आणखी एका व्हिडीओमध्ये केएल राहुलसोबत अथियालाही पाहिलं गेलं. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या दोघांना जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पहा क्लबमधील व्हिडीओ

KL Rahul seen at London Strip Club by u/zxo26 in BollyBlindsNGossip

‘नवविवाहित जोडप्याचा हा कोणत्या प्रकारचा हनिमून आहे. एखाद्याच्या निवडीबद्दल प्रश्न उपस्थित करत नाहीये पण हे जरा विचित्र वाटतंय’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘त्याची पत्नीसुद्धा त्याच्यासोबत आहे. जर तिला काही समस्या नसेल तर आपण कोण बोलणारे’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं होतं. अथिया आणि केएल राहुल यांनी 23 जानेवारी रोजी सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर लग्न केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.