गैरसमजुतीतच राहा, विषय संपला..; प्लास्टिक सर्जरीवरून ट्रोल करणाऱ्यांना आयेशा टाकियाने सुनावलं

आयेशा मोठ्या पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. बदललेल्या लूकवरून ट्रोल करणाऱ्यांना आता आयेशाने सडेतोड उत्तर दिलंय.

गैरसमजुतीतच राहा, विषय संपला..; प्लास्टिक सर्जरीवरून ट्रोल करणाऱ्यांना आयेशा टाकियाने सुनावलं
Ayesha Takia Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 9:27 AM

‘टार्झन: द वंडर कार’, ‘वाँटेड’ या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आयेशा टाकिया सध्या तिच्या लूकमुळे तुफान चर्चेत आहे. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिचा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. बोटॉक्स, फिलर्स, प्लास्टिक सर्जरी करून आयेशाने तिचं नैसर्गिक सौंदर्य गमावलंय, अशा टीका नेटकऱ्यांनी केल्या. टीकेचा भडीमार पाहून आयेशाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं होतं. मात्र नंतर तिने पुन्हा अकाऊंट सुरू केलं आणि विविध पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. आयेशा टाकियाला अजूनही खूप ट्रोल केलं जातंय. तिच्या विविध फोटोंवर आणि व्हिडीओंवर नेटकरी अत्यंत वाईट पद्धतीने कमेंट्स करत आहेत. आता आयेशाने पुन्हा एकदा ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये काही पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘कधीकधी तुम्हाला असं म्हणावं लागतं की या सर्व गोष्टींसाठी मी खूपच सुंदर आहे आणि आयुष्यात पुढे निघून जावं लागतं’, अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली. त्यावर तिने ‘प्रत्येकवेळी’ असं लिहिलंय. ‘मी स्वत:बद्दल अधिकाधिक स्पष्टीकरण द्यावं की लोकांमधील गैरसमज तसंच राहू द्यावं’, अशा आशयाची दुसरी एक पोस्ट तिने शेअर केली. त्यावर आयेशाने लिहिलंय, ‘गैरसमजुतीतच राहा, विषय संपला.’

‘प्रत्येकाने सांगितलेली गोष्ट केल्यावर प्रत्येकाला तुम्ही आवडता. पण जेव्हा तुमच्या काही मर्यादा असतात, तेव्हा कोणालाच तुम्ही आवडत नाही. मला स्वत:च्याच मर्यादा निश्चित करण्यास शिकावं लागलं. या मर्यादांविषयी मी जितकं समजत गेले, शिकत गेले, तितक्या कमी लोकांना मी आवडू लागली,’ असं सांगणाऱ्या एका महिलेचा रिलसुद्धा आयेशाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ही रिल शेअर करत तिने लिहिलंय, ‘तथ्य.’

हे सुद्धा वाचा

आयेशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. आयेशाच्या कमबॅकची प्रतीक्षा चाहत्यांनी खूप केली, मात्र तिच्याकडून कोणत्याच प्रोजेक्टची घोषणा झाली नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा तिला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं, तेव्हा पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर आयेशाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांनी आयेशाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं होतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.