चेहऱ्याचा सत्यानाश केलास..; आयेशा टाकियाचा नवा लूक पाहून नेटकरी चक्रावले

अभिनेत्री आयेशा टाकियाचा बदललेला लूक पाहून नेटकरी चक्रावले आहेत. तिच्या नव्या फोटोवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. नैसर्गिक सौंदर्याची वाट लावलीस, असं नेटकरी म्हणत आहेत. आयेशा ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती.

चेहऱ्याचा सत्यानाश केलास..; आयेशा टाकियाचा नवा लूक पाहून नेटकरी चक्रावले
आयेशा टाकियाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 2:14 PM

‘टार्झन: द वंडर कार’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘डोर’, ‘दिल मांगे मोअर’ यांसारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री आयेशा टाकिया प्रकाशझोतात आली. सलमान खानच्या ‘वाँटेड’ या चित्रपटामुळे तिला आणखी लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे. आयेशा मोठ्या पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आयेशाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये तिचा बदललेला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आयेशाचा हा नवीन लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये तिला ट्रोल केलंय.

या व्हिडीओमध्ये आयेशाने स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. सोनेरी काठाची आणि निळ्या रंगाची साडी तिने नेसली असून त्यावर तिने भरजरी दागिने घातले आहेत. मात्र आयेशाचा चेहरा यामध्ये पूर्णपणे वेगळा दिसून येत आहे. तिने प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स केल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आयेशाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘तू तुझा चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्याची वाट लावलीस’, असं एकाने म्हटलंय. ‘चेहरा खराब करायची काय गरज होती’, असंही दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘तू आधी किती सुंदर दिसायची, आता अशी का दिसतेस’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. काहींनी आयेशाच्या या लूकची तुलना इजिप्तमधल्या ममीशीही केली आहे.

आयेशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. आयेशाच्या कमबॅकची प्रतीक्षा चाहत्यांनी खूप केली, मात्र तिच्याकडून कोणत्याच प्रोजेक्टची घोषणा झाली नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा तिला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं, तेव्हा पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर आयेशाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांनी आयेशाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगला आयेशानेही उत्तर दिलं होतं.

“मला समजलंय की या देशात माझ्या दिसण्यावरून आणि चेहऱ्यावरून चर्चा करण्यापेक्षा दुसरा कोणता मुद्दाच उरलेला नाही. माझे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल करण्यात आले. त्यावर लोकांनी अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी माझ्या दिसण्यावरून अत्यंत वाईट कमेंट्स केल्या. खरं सांगायचं झालं तर मला कोणत्याच चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यात काहीच रस नाही. मी माझं आयुष्य आनंदाने जगतेय आणि मला कधीच प्रकाशझोतात यायचं नाहीये. मला कोणत्याच प्रसिद्धीची हौस नाही आणि मला कोणत्याच चित्रपटात काम करायचं नाहीये,” अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं होतं.

खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?
खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.