Swara Bhasker | “जर तिला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल..”; स्वरा भास्करच्या लग्नाबाबत महंतांचं वादग्रस्त वक्तव्य

स्वरा आणि फहादच्या लग्नावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुढच्या महिन्यात हे दोघं विधीवत लग्न करणार आहेत. यादरम्यान आता अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी स्वराच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Swara Bhasker | जर तिला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल..; स्वरा भास्करच्या लग्नाबाबत महंतांचं वादग्रस्त वक्तव्य
स्वरा भास्कर - फहाद अहमदच्या लग्नाविषयी बोलताना अयोध्येच्या महंतांची जीभ घसरलीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:55 AM

अयोध्या : आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे प्रकाशझोतात आली आहे. स्वराने काही दिवसांपूर्वीच समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद याच्याशी लग्न केलं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर 40 दिवसांनी तिने लग्नाचा खुलासा केला. स्वरा आणि फहादच्या लग्नावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुढच्या महिन्यात हे दोघं विधीवत लग्न करणार आहेत. यादरम्यान आता अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी स्वराच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

काय म्हणाले राजू दास?

“स्वराला भविष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मी तिला अल्टिमेटम देतो की तिने ज्या जातीत लग्न केलं आहे, त्यात बहिणीसोबतच लग्न केलं जातं. त्यानंतर महिलांना तीन तलाकच्या नावावर अनेक पुरुषांसोबत रात्र घालवावी लागते”, असं महंत राजू दास म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“जर स्वराला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर तिला लग्नाच्या शुभेच्छा. पण जर ती खरंच नारी शक्ती असेल तर तिला लग्न करायला पाहिजे नव्हतं. आता जर तिने लग्न केलंच आहे तर तिचं स्वागत आहे. सनातन धर्मावरून एक ओझं कमी झालं”, असंही ते पुढे म्हणाले.

स्वरा-फहादचं लग्न

स्वरा भास्करने लग्नानंतर स्पेशल मॅरेज ॲक्टला चीअर्स करत ट्विट केलं होतं. त्यात तिने लिहिलं, ‘कमीत कमी हे अस्तित्त्वात आहे आणि प्रेम करण्याची संधी देतोय… प्रेमाचा अधिकार, आपला जीवनसाधी निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, या एजन्सीचा अधिकार हा विशेषाधिक नसावा.’ स्वरा भास्करने राजकारणी फहाद अहमदशी कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत लग्न केलं. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. एका रॅलीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

साध्वी प्राची यांचं वादग्रस्त विधान

याआधी साध्वी प्राची यांनीसुद्धा स्वरा भास्करच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली होती. “स्वरा भास्करचे आधीही सूर वेगळे होते. तिला श्रद्धाच्या फ्रिजची आठवण झाली पाहिजे, ज्यामध्ये 35 तुकडे मिळाले होते. नुकतीच निक्की नावाच्या मुलीसोबत अशीच घटना घडली. मुली त्यांचा मार्ग भरकटतात, मात्र त्याचं दु:ख मला होतं. एकतर ती सुटकेसमध्ये जाते किंवा एखाद्या फ्रीजमध्ये सापडते. स्वरा भास्करचीही सूचना लवकरच मिळेल. तिच्या घटस्फोटाची सूचना लवकरच मिळेल”, असं त्या म्हणाल्या होत्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.