Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushmann Khurrana | मी कधीच कल्पना केली नव्हती…. ड्रीम गर्ल बद्दल आयुष्मान खुराना ने केले मोठे वक्तव्य !

आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या फ्रँचायझीबद्दल त्याने महत्वाचे वक्तव्य केले आहे.

Ayushmann Khurrana | मी कधीच कल्पना केली नव्हती.... ड्रीम गर्ल बद्दल आयुष्मान खुराना ने केले मोठे वक्तव्य !
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 1:00 PM

मुंबई | 21ऑगस्ट 2023 : बॉलिवूडच्या टॅलेंटड अभिनेत्यांपैकी एक असलेल्या आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana ) त्याच्या करीअरची सुरूवात वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी केली आणि यश मिळवत तो नव्या युगाच्या सिनेमाचा पोस्टर बॉय बनला. खरंतर आयुष्मान ज्या पद्धतीचे चित्रपट करतो, त्यापेक्षा ड्रीम गर्ल (Dream Girl) चित्रपटाची फ्रँचायझी खूप वेगळी आहे. 2019 साली आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि तो ब्लॉकबस्टरही ठरला.

ड्रीम गर्ल हा एक वेगळा चित्रपट होता, कारण त्यामध्ये मसाला कमर्शिअल चित्रपटाची सर्व वैशिष्ट्ये होती. आणि आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटामुळेही प्रेक्षकांमधील उत्साह आणखी वाढलेला दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाद्वारे आयुष्मान खुराना हा बॉलिवूडचा एकमेव तरुण स्टार बनणार , ज्याच्याकडे कमर्शिअल कॉमेडी चित्रपटाची फ्रँचायझी आहे.

काय म्हणाला आयुष्मान ?

याबाबत बोलताना आयुष्मान सांगतो की, ‘ माझ्या कारकिर्दीमध्ये मला हिट कॉमेडी फ्रँचायझी मिळेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. खरं सांगायचं झालं तर हे माझ्यासोबत चुकून घडलं. सुदैवाने, मी काही अशा प्रोजेक्ट्सचा शोध घेतला जे मजेदार तस असतील पण त्याद्वारे एखादा मेसेजही देता येईल आणि शक्य तितक्या लोकांशी कनेक्ट होता येईल. मला ड्रीम गर्ल फ्रँचायझी करण्याची संधी मिळाली. ही खरोखरच एक ब्रेक-आउट संकल्पना आहे जी माझ्या पिढीतील इतर नायकांनी शोधली नाही.’

“ एका कलाकाराच्या रुपात मला नेहमीच ओरिजनल रहायला आणि लोकांसमोर आईट-ऑफ-द- बॉक्स संकल्पना आणायला आवडतात. तुम्हाला ड्रीम गर्ल फ्रँचायझीपेक्षा जास्त काही मिळू शकत नाही. याच कारणामुळे पहिला चित्रपट लोकांना प्रचंड आवडला असं मला वाटतं. आणि आता ड्रीम गर्ल 2 च्या ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स पाहून असं समजतंय की आम्ही लोकांना ठोस, चांगल मनोरंजन देण्याच्या योग्य मार्गावर आहोत. लोकांना खरोखरच ड्रीम गर्ल 2 आवडेल अशी मला आशा आहे, ‘असंही आयुष्मान म्हणाला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.