Pathaan : ‘रेकॉर्ड बनवले जातात पण…’, पठाण सिनेमाच्या यशानंतर ‘बाहुबली 2’ च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया

'शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाने...', सिनेमाच्या यशानंतर काय म्हणाले 'बाहुबली 2' सिनेमाचे निर्माते? पठाण सिनेमाने अभिनेता प्रभास स्टारर 'बाहुबली 2' सिनेमाला देखील मागे टाकलं

Pathaan : 'रेकॉर्ड बनवले जातात पण...', पठाण सिनेमाच्या यशानंतर 'बाहुबली 2' च्या निर्मात्यांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 1:35 PM

Pathaan : तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दाखल झालेल्या अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पठाण सिनेमाने अभिनेता प्रभास स्टारर ‘बाहुबली 2’ सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. सिनेमाचं यश पाहून ‘बाहुबली 2’ च्या निर्मात्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाहुबली 2’ सिनेमाचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी ट्विट करत शाहरुख खान आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या शोबू यारलागड्डा यांनी केलेलं ट्विट सर्वत्र तिफान व्हायरल होत आहे.

शोबू यारलागड्डा ट्विट करत म्हणाले, ‘रेकॉर्ड बनवले जातात तोडण्यासाठी. पण शाहरुख खान याच्या सिनेमाने रेकॉर्ड मोडल्यामुळे अधिक आनंद होत आहे.’ शोबू यारलागड्डा यांनी सिनेमाला शुभेच्छा दिल्यानंतर ‘पठाण’ सिनेमाच्या निर्मात्यांनी देखील शोबू यारलागड्डा यांचे आभार मानले आहेत. पठाण सिनेमाने ४ मार्च रोजी ‘बाहुबली 2’ सिनेमाने रचलेले विक्रम मोडले आहेत. भारतात ‘पठाण’ सिनेमाने आतापर्यंत ५१३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर यशराज फिल्म्सने देखील शोबू यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय सिनेमा आता प्रगती करत आहे. हे चित्र पाहून खरंच प्रचंड आनंद होत आहे. तुम्ही एस एस राजामैली यांच्या दिग्दर्शनाखाली ‘बाहुबली 2’ सारख्या सिनेमाची निर्मिती केली. ‘बाहुबली 2′ सिनेमाने आम्हाला प्रेरणा दिली.’ सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

‘बाहुबली 2’ सिनेना २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने तेव्हा ५१०.९० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. ‘बाहुबली 2’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आजपर्यंत कोणीही रेकॉर्ड मोडला नव्हता. पण आता पठाण सिनेमा अनेक सिनेमांना मागे टाकत यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. पठाण सिनेमाने ३९ दिवसांत ५१३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे सिनेमा अजून किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जगभरात पठाण सिनेमाने १०२८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पठाण सिनेमा १००० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. अभिनेता आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमाने २०२४ कोटी रुपयांचा जगभरात गल्ला जमा केला होता. पठाण’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर देखील सिनेमाच्या टीमने ‘पठाण’चं प्रमोशम केलं नाही. तरी देखील सिनेमा मोठा कामगिरी करताना दिसत आहे.

‘पठाण’ सिनेमातून शाहरुख खान याने तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात एकच गर्दी करत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.