AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रभासच्या ताफ्यात भारदस्त Lamborghini, बाहुबलीच्या कारची किंमत….

दमदार अभिनयच्या जोरावर आता 'बाहुबली' प्रभासने एक भारदस्त कार विकत घेतली आहे. प्रभासच्या या बाहुबली कारची किंमत ऐकून त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत.

Video | प्रभासच्या ताफ्यात भारदस्त Lamborghini, बाहुबलीच्या कारची किंमत....
प्रभासच्या ताफ्यात भारदस्त Lamborghini
| Updated on: Mar 29, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने फारच कमी वेळात भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली आहे. ‘बाहुबली’ (Baahubali) या चित्रपटातून केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर प्रभासने भारताच्या कानाकोपऱ्यात आपले चाहते बनवले आहेत. प्रभासच्या चाहत्यांचे त्याच्यावर इतके प्रेम आहे की, त्याचा प्रत्येक चित्रपट हा सुपरहिट होतोच. दमदार अभिनयच्या जोरावर आता ‘बाहुबली’ प्रभासने एक भारदस्त कार विकत घेतली आहे. प्रभासच्या या बाहुबली कारची किंमत ऐकून त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत (Baahubali fame Actor Prabhas purchased Lamborghini sports car).

प्रभासचे चित्रपट केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात पहिले जातात. बॉलिवूडमध्येही अभिनेत्याने स्वत:ची अशी एक खास ओळख बनवली आहे. प्रभासच्या चित्रपटांनीही ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. याचा फायदा प्रभास यालाही झाला आहे.

Lamborghini खरेदी करणं होतं स्वप्न!

तेलुगू चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एका मुलाखती दरम्यान प्रभास म्हणाला होता की, आयुष्यात कधीतरी लॅम्बोर्गिनीची स्पोर्ट्स कार खरेदी करणे, हे त्याचे स्वप्न आहे. आता प्रभासने आपले हे स्वप्न पूर्ण केले आहे. सुपरस्टार प्रभासने वडिलांच्या वाढदिवशी लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटोर (Lamborghini Aventador) ही स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे.

बाहुबलीच्या कारची किंमत….

प्रभासच्या या सुंदर स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल 6 कोटी रुपये इतकी आहे. होय, लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटोर या स्पोर्ट्स कारची किंमत 6 कोटी रुपये आहे. प्रभासचे चाहते त्याच्या कारचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतकेच नाही तर त्याच्या कारशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत (Baahubali fame Actor Prabhas purchased Lamborghini sports car).

पाहा प्रभासच्या ‘बाहुबली’ कारचा व्हिडीओ :

या फोटो आणि व्हिडीओमध्ये प्रभास त्याच्या गाडीजवळ उभा असलेला दिसला आहे. काही व्हिडीओंमध्ये तो रस्त्यावर गाडी चालवतानाही दिसला आहे.

प्रभासकडे चित्रपटांची रांग!

प्रभासच्या वर्क-फ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याने नुकतेच ‘राधे श्याम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबतच प्रभास ‘आदिपुरुष’ आणि ‘सालार’च्या चित्रिकरणामध्येही व्यस्त आहे. आदिपुरुष या चित्रपटामध्ये प्रभाससह अभिनेत्री क्रिती सॅनोन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यानंतर प्रभास दिग्दर्शक नाग अश्विनच्या चित्रपटातही काम करणार असून, या चित्रपटात बॉलिवूड दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

(Baahubali fame Actor Prabhas purchased Lamborghini sports car)

हेही वाचा :

Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…

Birth Anniversary | काँग्रेस सरकारने उत्पल दत्त यांना पाठवलेले तुरुंगात! वाचा काय होते या मागचे कारण…

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.