बाबा सिद्दीकींनी हत्येपूर्वी कोणाला केलेला फोन? सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

Baba Siddique: दसऱ्याल्या गोळीबार करत बाबा सिद्दीकी यांची केली हत्या... हत्येपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी कोणाला केलेला फोन, निधनाच्या एक महिन्यानंतर मोठी माहिती समोर... सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

बाबा सिद्दीकींनी हत्येपूर्वी कोणाला केलेला फोन?  सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 8:25 AM

Baba Siddique- Salman Khan: ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करत हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी फक्त नेते नव्हते तर, बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत देखील त्यांचं खास कनेक्शन होते. प्रत्येक वर्षी ईदच्या मुहूर्तावर बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये संपूर्ण बॉलिवूड उपस्थित असायचा. अभिनेता सलमान खान देखील इफ्तार पार्टीमध्ये असायचा… आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीने बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हत्येच्या एक दिवस आधी बाबा सिद्दीकी यांना कोणाचा आलेला फोन?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला एक महिना होणार आहे. तरी देखील लोकांच्या मनातील जखमा ताज्या आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत राहुल कनाल यांनी मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल राहुल कनाल म्हणाले, ‘ते चांगले व्यक्त होते. हत्येच्या एक दिवस आधी मला त्यांचा फोन आला होता. मला त्यांनी एक वेळा नाही तर दोन वेळा फोन केला. मी झोपलो होतो त्यामुळे आमचं बोलणं झालं नाही. या गोष्टीचा पश्चाताप कायम राहिल… रात्री दीड वाजता त्यांचा फोन आला होता…’

राहुल पुढे म्हणाले, ‘मी आणि बाबा सिद्दीकी एका कॉलेजमध्ये शिकलो. मला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तेव्हा ते सर्वात आधी मदतीसाठी पुढे आले. याशिवाय कोणाच्याही मुलाला प्रवेश मिळाला नाही तर तो बाबांकडे यायचा. बाबांनी मुलाला शाळा-कॉलेजात प्रवेश तर मिळवून दिलाच, पण आठवडाभरानंतर त्याची फी देखील भरली.’

मृत्यूच्या तीन दिवस आधी राहुल बाबांना भेटला

राहुल यांनी सांगितलं की, ते मृत्यूच्या तीन दिवस आधी बाबा सिद्दीकी यांना भेटले होते. बाबा सिद्दीकी यांना मुलगा झिशान यांच्या करियरची चिंता सतावत होती. भेटीनंतर फोनवर तासभर चर्चा देखील झाली. बाबा सिद्दीकी यांना फक्त मुलाची चिंता सतावत होती… असं देखील राहुल म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट.
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती.
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?.
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?.
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल.
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख.
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ.
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?.
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?
विमानात शिंदेंचा आमदार? राऊतांचा शिंदे अन् शहांबद्दल खळबळजनक दावा काय?.
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.