Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baipan Bhari Deva | एकदम कडक! ‘बाईपण भारी देवा’च्या ट्रेलरचा प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर आपापल्या आयुष्यात पूर्णपणे मग्न झालेल्या या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेनिमित्त एकत्र येतात.

Baipan Bhari Deva | एकदम कडक! 'बाईपण भारी देवा'च्या ट्रेलरचा प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद
Baipan Bhari DevaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 8:59 AM

मुंबई : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई – पियूष यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

बाईपण भारी देवा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिलेल्या अशोक सराफ यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “चित्रपटातील सहा अभिनेत्रींना एकत्रित पडद्यावर काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी आहे. या सगळ्या अभिनेत्रींनी आतापर्यंत जे उत्तम काम अभिनयात केलंय ते खूप मोठं आहे. म्हणूनच मी देखील चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, लोकांना हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे.” या ट्रेलर लाँच सोहळ्यात पारंपरिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकारांनी घेतला.

पहा ट्रेलर

हे सुद्धा वाचा

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर आपापल्या आयुष्यात पूर्णपणे मग्न झालेल्या या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेनिमित्त एकत्र येतात. तेव्हा या सहाही बहिणींना एकमेकींच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची सुख-दु:ख कळतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या सहा बहिणी एकत्र येऊन कशा पद्धतीने मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात आणि त्याचसोबत वैवाहिक आयुष्याची कसरत कशा पद्धतीने करतात, याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरलाही खूप भारी प्रतिक्रिया मिळत आहेत. जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. येत्या 30 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.