‘बालिका वधू’ फेम आनंदीचं 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत अफेअर, लपवलं बाळ… सत्य अखेर समोर
Actress Avika Gor | स्वतःपेक्षा 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत अविका गौर हिचं अफेअर, लपवलं होतं बाळ... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्रीने सांगितलं सत्य..., सध्या सर्वत्र अभिनेत्री चर्चा... अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे आली आहे चर्चेत...

‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मालिका विश्वात काम करत असताना अभिनेत्रीचं नाव तिच्यापेक्षा 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रंगू लागली. ‘सुसराल सिमर का’ मालिकेतील अभिनेता मनिष रायसिंगन याच्यासोबत अविका हिच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या. रिपोर्टनुसार, दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे, अविका लग्नाआधी आई झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण तिने जगापासून मुलाला लपवून ठेवलं असं देखील अनेकदा समोर आलं. पण आता अभिनेत्रीने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा आमच्या नात्याची चर्चा रंगली होती. तेव्हा मला स्वतःला मोठा धक्का बसला. मला आणि मनिष वाटलं आपण असं काही दाखवत आहोत, ज्यामुळे आपल्याबद्दल अशा चर्चा रंगत आहेत. त्यामुळे आम्ही सेटवर बोलणं देखील बंद केलं.’




‘आम्ही सोबत कुठे जाणं देखील बंद केलं होतं. पण तरी देखील चर्चा थांबत नव्हत्या. आमच्या दोघांबद्दल अनेक गोष्टी रंगू लागल्या… आमचे आई-वडील देखील यावर हसायचे. एक दिवस माझे बाबा सेटवर आले आणि ते मनिषला म्हणाले अविका घरी सोडून दे. रंगणाऱ्या चर्चांचा आमच्या कुटुंबियांवर काहीही परिणाम झाला नाही.’
‘माझ्याबद्दल नको त्या चर्चा रंगल्या. माझा एक मुलगा आहे…. अशी चर्चा रंगली होती. सुरुवातील या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास व्हायचा. पण आता काहीही फरक पडत नाही…’ असं देखील अविका म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अविका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.