AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिना खान कायम बॅगेत ठेवते ‘ही’ खास गोष्ट, जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

Hina Khan: विश्वास असल्यामुळे हिना खान कायम बॅगेत ठेवते 'ही' खास गोष्ट, अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'हे' सत्य फार कमी लोकांना आहे माहिती..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिनाची चर्चा... कॅन्सरशी झुंज लढत असल्यामुळे हिना खान हिच्याबद्दल अनेक गोष्टी येत आहेत समोर

हिना खान कायम बॅगेत ठेवते 'ही' खास गोष्ट, जाणून तुम्हीही व्हाल अवाक्
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 2:59 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फार कमी कालावधीत अभिनेत्री टीव्ही विश्वावर आणि चाहत्यांच्या मनावर ताबा मिळवला. पण काही दिवसांपूर्वी हिनाने चाहत्यांसोबत धक्कादायक बातमी शेअर केली. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला असून चिंता देखील व्यक्त केली. अशात, हिनाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सांगायचं झालं तर, हिनाने अभिनेत्री होण्याचं स्वप्न कधी पाहिलंच नव्हत. हिना नशिबामुळे अभिनेत्री झाली. हिना मुंबई आली होती एयर – होस्टेस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. पण त्यादरम्यान तिला मलेरिया झाला आणि एअर होस्टेस ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये हिना जाऊ शकली नाही.

हिना हिचे स्वप्न वेगळे होते. पण तिच्या नशिबाला काही हटके मान्य होतं. अभिनय विश्वात करियर करायचं नसल्यामुळे हिना हिने त्यासाठी कधी प्रयत्न देखील केले नाहीत. एकदा हिना तिच्या मित्रांसोबत ’ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या ऑडिशनसाठी पोहोचली.

हे सुद्धा वाचा

ऑडिशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिना हिला मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांचा फोन आला. तेव्हा अभिनेत्री खूप आनंदी होती आणि हिनाने ऑफर स्वीकारली. हिनाच्या वडिलांना मुलीने मालिकेत काम करणं मान्य नव्हतं. पण हिना आनंदी असल्यामुळे त्यांनी देखील होकार दिला आणि हिना टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री झाली.

हिना बॅगेत कायम ठेवत खास गोष्ट

हिनाच्या बॅगेत अनेक गोष्टी असतात. पण त्यामध्ये एक खास गोष्ट आहे, जी अभिनेत्री कधीच विसरत नाही. हिना बॅगेत कायम एक ताबीज ठेवते. हिनाच्या बॅगेत कायम एक ताबीज असतो. हिनाची धर्मावरची गाढ श्रद्धा आहे की त्याच्याशी संबंधित काही अंधश्रद्धा, हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हिनाचा देवावर खूप विश्वास आहे. हिना खान हिच्या मालिका

हिना खान हिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे हिनाच्या आयुष्यात मोठे बदल झाले. चाहत्यांनी देखील हिनाला भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर ‘कसौटी जिन्दगी की 2 ‘ मालिकेमुळे हिनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिन्दगी की 2’ मालिकेशिवाय हिनाने अनेक मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील बजावली. ‘चांद छुपा बादल में’ आणि ‘सपना बाबुल का’ मालिकेत देखील हिना दिसली.

देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.