घाडगे अँड सून मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
आता महाराष्ट्राच्या लाडक्या सूनेनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
नेहमीच हटके अंदाजाच चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या भाग्यश्रीचा हा हटके आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
भाग्यश्री ही मनोरंजन विश्वामध्ये येण्याआधी आयटी कंपनीमध्ये काम करत होती. 2014 मध्ये तिलं 'मटा श्रावण क्विन' चा किताब मिळवला होता आणि त्यानंतर तिनं मनोरंज क्षेत्रात पदार्पण केलं.
'कलर्स मराठी' वरील 'घाडगे अँड सून' या मालिकेतून तिनं मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ही मालिका 2017 मध्ये प्रसारित झाली होती.