Bharti Singh: भारती सिंगने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा; चाहत्यांना विचारला खास ‘हा’ प्रश्न

भारती आणि हर्षच्या छोट्या कुटुंबात एप्रिल महिन्यात या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यापूर्वी अनेकदा प्रेग्नंसीसाठी प्रयत्न केल्याचं भारतीने सांगितलं होतं. यादरम्यान तिने बरंच वजनदेखील कमी केलं होतं.

Bharti Singh: भारती सिंगने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा; चाहत्यांना विचारला खास 'हा' प्रश्न
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:29 AM

कॉमेडियन भारती सिंगने (Bharti Singh) 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला. आता तिने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये पहिल्यांदाच मुलाचा चेहरा दाखवला आहे. भारती आणि हर्ष लिंबाचियाने (Haarsh Limbachiyaa) त्यांच्या मुलाचं नाव लक्ष असं ठेवलं आहे. लक्ष (Laksh) तिच्यासारखा दिसतो की हर्षसारखा, असा प्रश्न भारतीने या व्लॉगद्वारे चाहत्यांना विचारला आहे. या व्हिडीओत तिने लक्षचा रुम कसा आहे, तेसुद्धा दाखवलंय. लक्षचा चेहरा दाखवल्यानंतर हर्ष आणि भारतीने त्याला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केक कापत आनंद साजरा केला. लक्ष आतापासूनच अत्यंत संयमी असल्याचं भारतीने सांगितलं. ‘है ना हमारा गोला क्यूट? अब आप बताओ गोला किस पे गया है? मेरे पे या हर्ष पे?,’ असं कॅप्शन देत भारतीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘बाळ खूपच गोड आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तो ज्याप्रकारे केकजवळ बसला आहे, ते खूप क्यूट आहे. हा जगातला सर्वांत क्यूट मुलगा आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘कृष्ण कन्हैय्यासारखाच दिसतोय’, असं एका युजरने लिहिलंय. भारती आणि हर्षच्या छोट्या कुटुंबात एप्रिल महिन्यात या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यापूर्वी अनेकदा प्रेग्नंसीसाठी प्रयत्न केल्याचं भारतीने सांगितलं होतं. यादरम्यान तिने बरंच वजनदेखील कमी केलं होतं.

पहा व्हिडीओ-

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात ती कामावर रुजू झाली होती. कलर्स वाहिनीवरील ‘हुनरबाज’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालन हर्ष आणि भारती मिळून करत आहेत. यासोबतच ते ‘द खत्रा खत्रा शो’ याचंही सूत्रसंचालन करत आहेत. या वेळापत्रक मोठा खंड पडू नये यासाठी भारती बाळंतपणानंतर फार मोठी सुट्टी न घेता लगेच कामावर रुजू झाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.