एकटीच जगत असूनही Tabu हिने का नाही घेतलं मूल दत्तक? अभिनेत्रीने दिलेले उत्तर हैराण करणारं

अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं तब्बू हिचं नाव; पण कोणसोबत नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही; एकटीच जगत असलेल्या अभिनेत्रीने दत्तक मूल घेण्यावर केलं मोठं वक्तव्य...

एकटीच जगत असूनही Tabu हिने का नाही घेतलं मूल दत्तक? अभिनेत्रीने दिलेले उत्तर हैराण करणारं
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 1:02 PM

मुंबई : अभिनेत्री तब्बू (Tabu) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये काम करत असताना अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगल्या. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं. पण कोणासोबतच तब्बूचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. आज तब्बूकडे पैसा, संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही आहे. पण आयुष्यात कामय सोबत राहणारा व्यक्ती नाही. तब्बू आज एकटीच आयुष्य जगत आहे.

बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तब्बू हिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७० साली झाला. बाल कलाकार म्हणून अभिनेत्री करियरची सुरुवात केली. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजार’ सिनेमातून तब्बूने करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम नौजवान’ सिनेमात अभिनेते देव आनंद यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली.

तेलूगू सिनेमात तब्बूला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘कुली नम्बर वन’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर तब्बूने तिचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीला यश मिळालं. याच दरम्यान अभिनेत्रीचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

अभिनेता अजय देवगण याच्यासोबत देखील तब्बूचं नाव जोडण्यात आलं. तब्बू आणि अजय गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांचं चांगले मित्र आहेत. तब्बूने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. अभिनेत्रीने अजय देवगण याला अनेक गोष्टींसाठी जबाबदार ठरवलं. ‘अजयमुळे मी आज एकटी आहे…’ असं तब्बू म्हणाली होती.

बॉलिवूडमध्ये पाय ठेवल्यानंतर तब्बूचं नाव अभिनेता संजय कपूर याच्यासोबत जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीचं नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा नागार्जुन विवाहित होता. म्हणून नागार्जुन आणि तब्बू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्रींनी लग्न केलं नाही. पण आता अभिनेत्री दत्तक घेतलेल्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. याचबबातीत तब्बूला एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘मूल दत्तक घ्यायचं असतं तर कधीच घेतलं असतं. पण त्याला आई – वडील दोघांचं प्रेम मिळणार नसेल तर काय फायदा…’ अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते हैराण झाले.

सध्या तब्बू तिचा आगामी सिनेमा ‘भोला’ मुळे चर्चेत आहे. सिनेमा ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या सर्वत्र भोला सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.