AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Durgamati | बिन रांझे की ‘हीर’ हुई मैं…या भूमी पेडणेकरच्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली

भूमी पेडणेकर हिच्या आगामी 'दुर्गामती' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रत्येकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Durgamati | बिन रांझे की ‘हीर’ हुई मैं…या भूमी पेडणेकरच्या गाण्याने चाहत्यांची मने  जिंकली
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:16 PM

मुंबई : भूमी पेडणेकर हिच्या आगामी ‘दुर्गामती‘ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रत्येकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान या चित्रपटाचे ‘हीर’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. हे गाणे शेअर करताना भूमीने लिहले आहे की, “जैसे बिन रांझे के हीर अधूरी है… वैसे शक्ति के बिना चंचल.” (Bhumi Pednekar’s heer song from the movie Durgamati won the hearts of the fans) हे गाणे चंचल आणि तिचा प्रियकर रोहन यांच्यामधील प्रेम कथेवर आधारित आहे. रोहनची भूमिका करण कपाडियाने करत आहे तर चंचलची भुमिका भूमी पेडणेकर करत आहे. या गाण्यामध्ये चंचल एका वाड्यामध्ये येऊन रोहनसोबत घालवलेले चांगले क्षण आठवत असते.

हे गाणे मालिनी अवस्थीने गायले आहे. त्याचबरोबर त्याचे संगीत नमन अधिकारी, अभिनव शर्मा आणि मालिनी अवस्थी यांनी दिले आहे. या गाण्याचे बोल दीप्ती मिश्रा यांनी लिहिले आहेत. या अगोदर चित्रपटाचे पहिले गाणे ‘बरस बरस’प्रदर्शित झाले होते. हे गाणे प्रख्यात गायक बी पारक यांनी गायले आहे, हे एक थरारक गाणे आहे. भूमी पेडणेकर आणि करण कपाडियावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात भूमी आणि करणची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळाली. करणचा हा असा पहिला चित्रपट आहे जो कदाचित त्याला एक वेगळी ओळख देऊ शकेल. यापूर्वी करण ब्लाँक या चित्रपटात दिसला होता. दुर्गामतीमध्ये लोक भूमी आणि करणच्या केमिस्ट्रीचा वाट पहायत आहेत. हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. भूमी पेडणेकर ‘दुर्गामती’ या चित्रपटात  दणदणीत भूमिकेत दिसत आहे. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसत आहे. दुर्गामती चित्रपट अक्षय कुमार निर्मित आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव दुर्गावती असे होते परंतु ते बदलून दुर्गामती करण्यात आले. अक्षयला चित्रपट लक्ष्मी बॉम्बसारख्या कोणत्याही वादात पडायचे नसल्यामुळे अक्षयने अगोदरच चित्रपटाचे नाव बदलून घेतले आहे.

संबंधित बातम्या :

Entertainment | डिसेंबर महिन्यात मनोरंजनाची मोठी मेजवानी, नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Anupam Kher | ‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान

(Bhumi Pednekar’s heer song from the movie Durgamati won the hearts of the fans)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.