Garba Queen | एका हट्टामुळे सर्वकाही झालं उद्ध्वस्त, फाल्गुनी पाठक यांच्याबद्दल मोठं सत्य अखेर समोर

एका हट्टामुळे गरबा क्विनचं आयुष्य झालं उद्ध्वस्त; आता कुठे आहेत फाल्गुनी पाठक; इंडस्ट्रीमधून का झाल्या दूर? थक्क करणारं कारण समोर...

Garba Queen | एका हट्टामुळे सर्वकाही झालं उद्ध्वस्त, फाल्गुनी पाठक यांच्याबद्दल मोठं सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 10:34 AM

मुंबई | ‘मैंने पायल है खनकाये’, ‘चुडी’, ‘मेरी चुनर उड उड जाये’, ‘ये किसने जादू किया’ यांसारख्या गाण्यांमुळे ९० च्या दशकातील दिवस आजही अनेकांना अठवतात. आजच्या ‘रिमिक्स’च्या जगात ९० च्या दशकातील गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. ९० च्या दशकाला एक वेगळं वळण देणाऱ्या गरबा क्विन फाल्गुनी पाठक आज कुठे आहेत, काय करतात? याबद्दल फार कोणाला माहिती नाही. फक्त भारतात नाही तर परदेशात देखील फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आजही नवरात्र त्यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होवू शकत नाही. कायम एखाद्या मुलासारख्या राहण्या फाल्गुनी पाठक एक मुलगी आहेत, हे कोणाला माहिती नव्हतं..

पण गाण्यांमुळे आणि मधूर आवाजामुळे फल्गुनी पाठक यांची लोकप्रियता वाढत गेली आणि गरबा क्लिनबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. पण आता फाल्गुनी पाठक कुठे आहेत? याबद्द प्रश्नचिन्ह आहे. सिनेमांच्या गाण्यांपेक्षा फाल्गुनी पाठक यांचे अल्बम तुफान लोकप्रिय व्हायचे. ज्यामुळे बॉलिवूडमधून त्यांना अनेक संधी देखील आल्या. पण त्यांनी बॉलिवूडमध्ये न गाण्याचा निर्णय घेतला.

खुद्द बॉलिवूडमधून चांगल्या ऑफर फाल्गुनी पाठक यांनी का फेटाळल्या? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर खुद्द फाल्गुनी पाठक यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. त्या एका उत्तरामुळे देखील फाल्गुनी पाठक तुफान चर्चेत आल्या. फाल्गुनी पाठक एका हट्टामुळे बॉलिवूडपासून दूर राहिल्या.

बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय सांगत फाल्गुनी पाठक म्हणाल्या, ‘मी बॉलिवूडकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही. पण तुम्ही जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करता, तेव्हा तुम्हाला अधिक मेहत घ्यावी लागते. मी माझे शो आणि अल्बम करुन आनंदी होती..’ असं देखील फाल्गुनी पाठक म्हणाल्या होत्या.

मुलासारख्या का राहतात फाल्गुनी पाठक?

फाल्गुनी पाठक यांच्या जन्मापूर्वी त्यांचा चार बहिणी होत्या. त्यामुळे आई वडिलांना आणि चार बहिणींना एक भाऊ हवा होता. अशात फाल्गुनी पाठक यांचा जन्म झाला. पण गरबा क्विन यांच्या चार बहिणींनी सर्वात लहान बहिणीला भाऊ मानलं. फाल्गुनी पाठक यांच्या बहिणींनी कायम लहान बहिणीला मुलासारखं ठेवलं. कपडे देखील मुलासारखेच दिले.

फाल्गुनी पाठक यांचे केस वाढले, तरी ते लगेच कापले जायचे. लहानपणापासून सुरु झालेली सवय यशाच्या शिखरावर चढताना ओळख झाली. आज फाल्गुनी पाठक सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसल्या तरी चाहत्यांच्या मनात मात्र आजही कायम आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.