सैफ अली खानच्या हल्लेखोराबद्दल मोठी माहिती समोर, थेट कनेक्शन…
Saif Ali Khan: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान हल्ला प्रकरणाची चर्चा... सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर, हल्लेखोराचं महत्त्वाचं कनेक्शन अखेर समोर, पोलीस करत आहेत कसून चौकशी

Saif Ali Khan: 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर याच्या वांद्रे येथील घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. अज्ञात व्यक्तीने अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर 19 जानेवारी रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी ठाणे येथून शरीफुल याला अटक केली होती. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. सैफ अली खान याच्या हल्लेखोराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सध्या सर्वत्र सैफ अली खान याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफच्या हल्लेखोराकडे जेवणासाठी पैसे नव्हते… असं त्याने आपल्या रूममेट्सना सांगितलं होतं. सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, ऑनलाइन पेमेंटद्वारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला होता. 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चोरीच्या प्रयत्नानंतर शरीफुल इस्लाम शहजाद ज्या व्यक्तींना पहिल्यांदा भेटला ते त्याचे रेममेट्स दुब्लू कुमार बालेश्वर यादव आणि रोहित यादव होते.
16 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास शरीफुल वरळी कोळीवाडा येथे त्यांच्यासोबत राहणाऱ्या खोलीत पोहोचला होता. दुब्लू कुमार नंतर जवळच्या एटीएम सेंटरमधून 1 हजार रुपये काढताना आणि ते त्याला देताना दिसला… असे वांद्रे पोलिसांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या सोळाशे पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.
View this post on Instagram
आरोपपत्रात असे दिसून आले आहे की, शरीफुलचा शोध घेण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी पोलिस पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) सारख्या तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून होते. तपासकर्त्यांनी त्याला अटक होईपर्यंत त्याच्या कोणत्याही साथीदारांची किंवा इतर संशयितांची चौकशी केली नाही.
दुब्लू कुमारच्या आरोपपत्रात समाविष्ट केलेल्या जबाबानुसार, तो सप्टेंबर 2024 मध्ये वरळी कोळीवाडा येथील खोलीत राहत होता. तो हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करत होता आणि त्याचा सहकारी रोहित यादवसोबत खोली शेअर करत होता.