Saif Ali Khan याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

Saif Ali Khan : सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया... आता कशी आहे अभिनेत्याची प्रकृती? सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर... चाहत्यांकडून चिंता व्यक्त... सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या प्रकृतीची चर्चा...

Saif Ali Khan याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 9:40 AM

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या सेटवर गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याची चर्चा रंगली आहे. मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु आहे. सध्या सैफ याच्यासोबत पत्नी करीना कपूर उपस्थित आहे. आता सैफ अली खान याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. एवढंच नाही तर, खुद्द सैफ अली खान याने देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर सैफ अली खान म्हणाला, ‘आपण जे काही करतो… त्याचा परिणाम जखम आणि शस्त्रक्रिया आहे… डॉक्टरांची साथ असल्यामुळे माझी प्रकृती आता स्थिर आहे. माझ्या हितचिंतकांचे देखील आभार मानतो… शस्त्रक्रिया झालेले हात मिळवून मी आनंदी आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

सेटवर जखमी झाला सैफ अली खान…

सैफ अली खान याला नक्की दुखपत कशामुळे झाली याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. पण रिपोर्टनुसार, सिनेमाची शुटिंग करत असताना अभिनेता गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याच्या गुडघ्यासोबतच खांद्यालाही दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खान याला दुखापत कशी आणि कोणत्या खांद्यावर झाली हे समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, याआधी देखील सैफ अली खान याला केकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. 2016 मध्ये रंगून सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सैफ सेटवर जखमी झाला होता. त्यादरम्यान त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली. सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आला. अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. आता सैफ अली खान याला कधी रुग्णालयातून सुट्टी मिळते या प्रतीक्षेत चाहते आहेत. सैफ याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहते कायम सैफच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.