Bigg Boss 14 | जास्मीन भसीनला पाहून सलमानला कतरिना आठवली!

सलमानने यावेळी घरातल्या स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने पाठीमागून बोलणाऱ्या स्पर्धकांना चांगलेच बोल लगावले.

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनला पाहून सलमानला कतरिना आठवली!
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 11:07 AM

मुंबई :बिग बॉस’च्या घरात नुकताच ‘विकेंड का वार’ पार पडला. या भागात स्पर्धकांच्या आठवडाभराच्या खेळावर सलमानच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. भागाच्या सुरुवातीला सलमान खानने (Salman Khan) सगळ्या स्पर्धकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने यावेळी घरातल्या स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने पाठीमागून बोलणाऱ्या स्पर्धकांना चांगलेच बोल लगावले. तर, यावेळी त्याने जास्मीन भसीनचे (Jasmin Bhasin) तोंड भरून कौतुक केले. (Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

गरबा क्वीन प्रीती-पिंकीची घरात एंट्री

नवरात्रीच्या निमित्ताने घरात खास पाहुण्यांचे आगमन झाले होते. गरबा क्वीन प्रीती आणि पिंकी या दोन बहिणींनी घरात एंट्री घेत, सगळ्या स्पर्धकांना गरब्याच्या तालावर फेर धरायला लावले. या निमित्ताने काळ घरात नवरात्रीची धूम पाहायला मिळाली. या दोघी घरात पाहुण्या म्हणून आल्या होत्या. कोरोनाची दाहकता लक्षात घेता या दोघींनी वेगवेगळ्या काचेच्या केबिनमधून गाणी गायली.

दिव्या खोसलाची सरप्राईझ व्हिझिट

प्रीती आणि पिंकीसोबतच घरात ‘टी सीरीज’च्या दिव्या खोसला-कुमारची देखील एंट्री झाली होती. घरात आलेल्या दिव्याने स्पर्धकांना एक खास टास्क दिला होता. दोन दोन स्पर्धकांच्या जोड्यांना एकमेकांसमोर बसून, त्यांच्या डोळ्यात आपल्याला काय दिसते ही सांगायचे होते. या टास्क दरम्यान जान कुमार सानूने पुन्हा एकदा निक्की तंबोलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट भडकलेल्या निक्कीने जानला चांगलेच बोल सुनावले. या टास्क दरम्यान सगळेच स्पर्धक एकमेकांवर राग काढताना दिसले.( Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

चंद्रमुखीची झलक

सलमानने व्हिडीओ कॉलवर एका खास पाहुण्याची स्पर्धकांशी भेट घडवली. ही खास पाहुनी होती अभिनेत्री कविता कौशिक. यावेळी कविताने घरातल्या स्पर्धकांशी गप्पा मारल्या. त्याचबरोबर ती एजाज खानची मस्करी करताना दिसली. या घरात कविताची ‘वाईल्ड कार्ड’ एंट्री होणार असल्याची कुणकुणदेखील घरातल्या इतर स्पर्धकांना नाहीय.

टीव्हीची कतरिना कैफ

या भागात सलमानने (Salman Khan) सगळ्याच स्पर्धकांना बोल लावले दिसले. मात्र, यावेळी त्याने जास्मीन भसीन (Jasmin Bhasin)चे विशेष कौतुक केले. तू मला खूप आवडतेस, कारण तू टीव्हीची कतरिना कैफ आहेस, असे सलमानले जास्मीनला म्हटले आहे. सलमानच्या या कौतुकाने सध्या जास्मीनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भागाच्या शेवटी जाता-जाता सलमानने आजपेक्षा उद्या जास्त मजा येणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. आजच्या म्हणजेच रविवारच्या भागात नव्या चेहऱ्यांची एंट्री होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

(Bigg Boss 14 Latest update Salman Khan praised Jasmin bhasin)

संबंधित बातम्या : 

Salman Khan | टीआरपीसाठी ओरडल्याने काहीच साध्य होत नाही, सलमान खानचा खोचक टोला! 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.