AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | राहुल वैद्यवर निक्की तांबोळी नाराज, वाचा काय घडलं

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये आता फक्त पाच स्पर्धेक राहिले आहेत आणि या पाचपैकीच बिग बॉस 14 चा एकजण विजेता असणार आहे.

Bigg Boss 14 | राहुल वैद्यवर निक्की तांबोळी नाराज, वाचा काय घडलं
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:58 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये आता फक्त पाच स्पर्धेक राहिले आहेत आणि या पाचपैकीच बिग बॉस 14 चा एकजण विजेता असणार आहे. बिग बॉस 14 च्या फिनालेसाठी आता आठ दिवसांपेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. बिग बॉस 14 च्या संपूर्ण भागामध्ये जे सदस्य भांडणे करताना दिसत होते त्यांच्यामध्ये आता कुठेतरी मैत्रीचे नाते बघायला मिळत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात आरजे आले होते. ( Bigg Boss 14 |Nikki Tamboli upset with Rahul Vaidya)

त्यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले यावेळी आरजेने राहुलला विचारले की, तुझ्या लग्नात तू घरातील सदस्यांपैकी कोणासा बोलवणार याला उत्तर देताना राहुल म्हणाला की, यासाठी मला दिशासोबत चर्चा करावी लागेल कारण मी तिला न विचारता यांना बोलवले आणि तिच लग्नाला आली नाहीतर हे राहुलचे उत्तर ऐकल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना आपले हासू आवरता आले नाही.

राहुलने रूबीना दिलैकसाठी एक गाणे गायले आणि सर्वांना आनंदाचा धक्का दिला यावेळी ‘तू है मेरी किरण’ हे गाणे त्याने रूबीनासाठी गायले. राहुल वैद्यला जेव्हा विचारले गेले की, निक्कीने तुला इम्युनिटी दिली. परंतु त्यानंतरही तु निक्कीची काहीच मदत केली नाही तू निक्कीवर का नाराज आहेस? त्याला उत्तर देताना राहुल म्हणतो की, मी माझ्या आणि निक्कीच्या नात्याबद्दल खूप जास्त कन्फ्यूज आहे. हे ऐकल्यावर निक्कीला राहुलचा राग येतो आणि त्यानंतर निक्कीमध्ये आणि राहुलमध्य वाद निर्माण होतो.

संबंधित बातम्या : 

बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!

Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

(Bigg Boss 14 | Nikki Tamboli upset with Rahul Vaidya)

हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.