Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

यंदाच्या या शोचं खास वैशिष्ट्यं म्हणजे यावेळी नव्या स्पर्धकांसह जूने स्पर्धकही बिग बॉसच्या घरात असणार आहेत.

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 4:41 PM

नवी दिल्ली : बिग बॉस-14 चे काऊंटडाऊन सुरू झाले असून काही तासांतच हा शो चाहत्यांना पाहता येणार आहे. यंदाच्या या शोचं खास वैशिष्ट्यं म्हणजे यावेळी नव्या स्पर्धकांसह जूने स्पर्धकही बिग बॉसच्या घरात असणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. मार्गदर्शक म्हणून अनेक जुन्या स्पर्धकांना बिग बॉस 14 मध्ये पुन्हा घेण्यात आलं आहे. (bigg boss 14 salman khan fees sidharth shukla also take huge amount)

या लिस्टमध्ये बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचंदेखील नाव आहे. सिद्धार्थ शुक्लाची लोकप्रियताही मोठी आहे. त्याच्यामुळे कोणताही प्रोग्राम हिट होतो. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सिद्धार्थला पुन्हा एकदा या शोमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे.

बिग बॉस 14 मध्ये सिद्धार्थ शुक्लाची फी किती?

चांगल्या प्रसिद्धीमुळे आणि मोठा फॅन क्लब असल्यामुळे सिद्धार्थ प्रत्येक कार्यक्रमाची भरघोस फी घेतो. बिग बॉसच्या निर्मात्यापेक्षाही सिद्धार्थ शुक्लाची फी जास्त असल्याचं बोललं जातं आहे. सलमान खान सुद्धा बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे. त्यामुळे तो कार्यक्रमासाठी किती फी घेतो, हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्ला प्रत्येक आठवड्याची 35 ते 40 लाख फी घेतो. आता सलमान खानच्या फीसमोर ही रक्कम तर शुल्लक आहे. पण एखाद्या टीव्ही अभिनेत्याला एवढी मोठी रक्कम मिळावी ही आश्चर्याची बाब आहे.

राधे माँ आहे सगळ्यात महागडी स्पर्धक?

यंदाच्या बिग बॉसमध्ये राधे माँ हे एक नाव चर्चेचा विषय ठरलं आहे. या सीझनमध्ये राधे माँने सगळ्यात जास्त फी घेतली असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राधे माँ प्रत्येक आठवड्याचे 25 लाख रुपये घेते. इतकंच नाही तर राधे माँ ही फक्त एकाच आठवड्यासाठी शोमध्ये आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या – 

PHOTO | मराठी ‘बिग बॉस’ फेम सई लोकूरचा साखरपुडा, पाहा खास फोटो

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद

(bigg boss 14 salman khan fees sidharth shukla also take huge amount)

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.