Bigg Boss 14 | निशांत मलकानीला बिकिनी, रुबिनाला एक जोडी कपडे, ‘तूफानी सिनिअर्स’च्या त्रासाने स्पर्धक हैराण

बिग बॉसच्या घरात दाखल झालेले तुफानी सिनिअर्स (Toofani seniors) नव्या स्पर्धकांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत

Bigg Boss 14 | निशांत मलकानीला बिकिनी, रुबिनाला एक जोडी कपडे, ‘तूफानी सिनिअर्स’च्या त्रासाने स्पर्धक हैराण
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:56 AM

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरात आपली रणनीती आखून आलेले स्पर्धक आता चांगलेच हैराण झाले आहे. या शानदार घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सगळ्या रणनीतीवर पाणी फिरले आहे. या नव्या पर्वाला वेगळा ‘ट्विस्ट’ देण्यासाठी, गेल्या पर्वातील 3 ‘तूफानी सिनिअर्स’ (Toofani Seniors) घरात दाखल झाले आहेत. या तुफानी सिनिअर्सनी नव्या स्पर्धकांना चांगलाच त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी रिजेक्ट झालेल्या स्पर्धकांना त्यांनी आगळेवेगळे टास्क दिले आहेत. यात, स्पर्धक निशांत मलकानीला पूर्ण आठवडा बिकिनी घालून फिरावे लगणार आहे. तर, अभिनेत्री रुबिनाला संपूर्ण आठवडा एकच जोडी कपडे वापरायला लागणार आहेत (Bigg Boss 14 Toofani Seniors irritate new contestants).

पहिल्याच दिवशी रिजेक्ट लिस्टमध्ये सामील झालेल्या स्पर्धकांना तूफानी सिनिअर्सनी (Toofani Seniors) दिलेले टास्क पूर्ण करून पुन्हा खेळात परतता येणार आहे. याच संधीचा फायदा घेत तूफानी सिनिअर्सनी नव्या स्पर्धकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

एकाला बिकिनी तर, दुसरीला मिरची!

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातला नवा स्पर्धक अभिनेता निशांत मलकानीला संपूर्ण आठवडाभर बिकिनी घालून घरात वावरावे लागणार आहे. तर, खेळात परतण्यासाठी रुबिना दिलायकला पूर्ण आठवडा एक जोडी कपड्यात वावरावे लागणार आहे. या आधी रुबिनाला मिरच्या खाण्याचा टास्क देण्यात आला होता. मात्र, तिने हा टास्क पूर्ण केलेला नाही. दुसरीकडे, स्पर्धक जान कुमार सानुला डोक्यावरील मधल्या भागातील केस कापण्यास सांगण्यात आले आहे. निशांत मलकानी बिकिनी परिधान करण्यास तयार झाला. मात्र, रुबिनाने नवा टास्क करण्यासही नकार दिला आहे (Bigg Boss 14 Toofani Seniors irritate new contestants).

जेवणाच्या ताटावर टोकल्याने पवित्रा-गौहरमध्ये जोरदार भांडण!

पहिल्या दिवशी निक्की आणि जास्मीनमध्ये चांगलेच भांडण जुंपले होते. आता तूफानी सिनिअर गौहर खान आणि नवी स्पर्धक पवित्रा पुनिया यांच्यातही जोरदार भांडण होणार आहे. तूफानी सिनिअर्स (Toofani seniors) नव्या स्पर्धकांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. पवित्रा पुनिया जेवायला बसल्यावर, तिथे गौहर येऊन तिला प्रश्न करते. त्यामुळे पवित्रा तिच्याशी वाद घालयला सुरुवात करते. जेवणाचा पहिलाच घास तोंडात टाकल्यावर गौहर पवित्राला, तु सगळे तूफानी सिनिअर्स जेवले की नाही हे तपासले का?, असा प्रश्न विचारते. जेवण्याच्या ताटावर असा प्रश्न केल्याने वैतागलेली पवित्रा गौहरला प्रतिप्रश्न करण्यास सुरुवात करते. त्यांचा हा प्रश्नांचा सिलसिला हळूहळू वादाचे रूप घेतो. त्यामुळे या दोघींमध्ये चांगलीच वादावादी होणार आहे.

(Bigg Boss 14 Toofani Seniors irritate new contestants)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद, जास्मीन भसीन-निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक चकमक

Bigg Boss 14: फक्त सलमान खानच नाही तर सिद्धार्थ शुक्लाची फी वाचून व्हाल थक्क!

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.