AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची ‘मंडली’ तुटली?

बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत नातं टिकवणं हे स्पर्धकांसमोर सर्वांत कठीण आव्हान असतं. प्रत्येक सिझननुसार नव्या नाती प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोळाव्या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली.

Bigg Boss 16 | सोबत खेळले, चर्चेतही राहिले, आता असं काय घडलं ज्यामुळे बिग बॉसची 'मंडली' तुटली?
Bigg Boss 16 MandaliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 3:38 PM

मुंबई : बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जेव्हा ट्रॉफीसाठी एकमेकांविरोधात उभे असतात, तेव्हा मैत्री कितीही घट्ट असली तरी त्यात वितुष्ट येताना अनेकदा पाहिलं गेलंय. बिग बॉसच्या घरात नाती टिकवणं हे स्पर्धकांसमोरील मोठं आव्हान असतं. मात्र प्रत्येक सिझननुसार नवीन नातीसुद्धा बनतात. बिग बॉसचा सोळावा सिझन चांगलाच गाजला. एकीकडे सर्वांशी पंगा घेऊन प्रियांका चहर चौधरीने स्वतंत्र खेळाकडे लक्ष केंद्रित केलं. तर दुसरीकडे मैत्रीच्या नावाखातर काही स्पर्धकांनी मिळून मंडली बनवली. याच मंडलीच्या माध्यमातून हे स्पर्धक खेळात पुढे सरकले. मात्र या मंडलीमधील स्पर्धकांची मैत्री पाहून चाहते फार खुश झाले होते.

बिग बॉसची ट्रॉफीसुद्धा मंडलीचा सदस्य एमसी स्टॅनने जिंकली. संपूर्ण मंडलीला एमसी स्टॅनच्या विजयापेक्षा प्रियांका चहर चौधरीच्या पराजयाने जास्त आनंद झाला होता. बिग बॉसचा शो संपल्यानंतरही मंडलीतील सदस्य एकत्र दिसले. कधी पार्ट्यांमध्ये तर कधी इव्हेंट्समध्ये मंडलीतील सदस्यांना सोबत पाहिलं गेलं. साजिद खानने बनवलेली ही मंडली बराच वेळ चर्चेत राहिली. मात्र आता ही मंडली तुटल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून मंडलीतील सदस्य एकत्र दिसत नव्हते. या मंडलीत साजिद खान, अब्दु रोझिक, निमृत कौर आहलुवालिया, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल तौकिर खान यांचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात निमृतला मंडलीबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर ती कंटाळून म्हणाली, “नेहमीच काय मंडलीबद्दल प्रश्न विचारता?” याशिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये अब्दु रोझिक म्हणताना दिसतोय की, “मंडली खत्म”.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अब्दुला एमसी स्टॅनबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर अब्दु म्हणतो “दोस्ती खत्म”. अब्दु आणि एमसी स्टॅन यांच्यात काहीतरी वाद झाल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शिव आणि निमृत एकत्र म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार होते. मात्र त्यांच्या या व्हिडीओचंही काम अद्याप सुरू झालं नाही. त्यामुळे फक्त बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी मंडलीतील स्पर्धकांनी एकमेकांशी मैत्री केली होती का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.