Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनने रचला इतिहास; शाहरुख खानलाही टाकलं मागे

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याची क्रेझ आणखी वाढली आहे. एमसी स्टॅनने सोशल मीडियावर लाइव्ह येऊन विराट कोहली आणि शाहरुख खानचाही विक्रम मोडला आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तो पहिल्यांदाच लाइव्ह आला होता आणि त्याने इतिहास रचला.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनने रचला इतिहास; शाहरुख खानलाही टाकलं मागे
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:32 AM

मुंबई : बिग बॉस 16 चं विजेतेपद पटकावल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन हा खूप मोठा सेलिब्रिटी बनला आहे. एमसी स्टॅनचे देशभरात किती चाहते आहेत, याची प्रचिती प्रेक्षकांना बिग बॉसच्या वोटिंगदरम्यान पहायला मिळाली. मात्र आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याची क्रेझ आणखी वाढली आहे. एमसी स्टॅनने सोशल मीडियावर लाइव्ह येऊन विराट कोहली आणि शाहरुख खानचाही विक्रम मोडला आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तो पहिल्यांदाच लाइव्ह आला होता आणि त्याने इतिहास रचला.

एमसी स्टॅन इन्स्टाग्रामवर फक्त 10 मिनिटांसाठी लाइव्ह आला होता. यादरम्यान त्याने त्याच्या चाहत्यांसाठी लाइव्ह गाणीसुद्धा गायली. एमसी स्टॅनला लाइव्ह आल्याचं पाहताच त्याचे चाहते आणि बरेच सेलिब्रिटीसुद्धा या लाइव्हला जोडले गेले. पाहता पाहता स्टॅनने नवीन विक्रमसुद्धा रचला. स्टॅनच्या या लाइव्हमध्ये जितके चाहते जोडले गेले, तितके शाहरुख खान आणि विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींच्या लाइव्हलाही चाहते जोडले जात नाहीत.

एमसी स्टॅनच्या लाइव्ह व्ह्यूजचा रेकॉर्ड

सोशल मीडियावर एमसी स्टॅनच्या या लाइव्हचे व्ह्यूज तब्बल 541k इतके झाले होते. अवघ्या काही मिनिटांत व्ह्यूजचा इतका मोठा आकडा गाठणारा स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. त्याने बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचाही विक्रम मोडला आहे. आतापर्यंत भारतातील कोणत्याच सेलिब्रिटीला इतके लाइव्ह व्ह्यूज मिळाले नव्हते. शाहरुख खानच्या इन्स्टाग्राम लाइव्हला जवळपास 255k इतके व्ह्यूज मिळायचे. तर बिग बॉसच्याही इतर स्पर्धकांच्या तुलनेत स्टॅन खूपच पुढे निघून गेला आहे.

हे सुद्धा वाचा

जगभरातील टॉप 10 लाइव्हमध्ये एमसी स्टॅनचा समावेश

एमसी स्टॅनचं हे इन्स्टाग्राम लाइव्ह आता जगभरातील टॉप 10 व्ह्यूज मिळालेल्या लाइव्हमध्ये समाविष्ट झाला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, निक्की मिनाज आणि BTS सदस्य जंगकूक, तेह्युंग यांच्या रांगेत आता स्टॅन येऊन पोहोचला आहे.

विराट कोहलीचाही मोडला होता रेकॉर्ड

याआधीही स्टॅनने क्रिकेटर विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. रविवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. शो जिंकल्यानंतर त्याने सूत्रसंचालक सलमान खानसोबतचा ट्रॉफीचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला होता. या पोस्टला 69,52,351 लाइक्स आणि 1,47,545 कमेंट्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे याआधी बिग बॉस जिंकणाऱ्या कोणत्याच स्पर्धकाला सोशल मीडियावर इतके लाइक्स आणि कमेंट्स मिळाले नव्हते. एमसी स्टॅनने याबाबतीत बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि बिग बॉस 14 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांनाही मागे टाकलं आहे.

बिग बॉस 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅन आता लवकरच देशभरात टूर करणार आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने याची घोषणा केली. स्टॅनच्या या घोषणेनंतर काही मिनिटांतच मुंबई आणि पुण्यातील सर्व तिकिटं विकली गेली आहेत. यावरूनच स्टॅनच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.