Bigg Boss 16 Winner | ‘बिग बॉस 16’च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी; चर्चेतलं नावंच जिंकणार ट्रॉफी?

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकू शकतं आणि कोणाला रिकाम्या हाती घरी जावं लागेल, याची सोशल मीडियावर भविष्यवाणी केली जात आहे. या भविष्यवाणीनुसार बिग बॉस 16 च्या विजेतेपदी चर्चेतलं नाव असल्याचं समोर येत आहे.

Bigg Boss 16 Winner | 'बिग बॉस 16'च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी; चर्चेतलं नावंच जिंकणार ट्रॉफी?
कोण ठरणार 'बिग बॉस 16'चा विजेता? ग्रँड फिनालेच्या आधीच झाली भविष्यवाणी Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 2:43 PM

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. चार महिन्यांनंतर अखेर या शोला त्याचा विजेता मिळणार आहे. ‘बिग बॉस 16’चा विजेता कोण ठरणार यावरून सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यावरून भविष्यवाणीही केली जात आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकू शकतं आणि कोणाला रिकाम्या हाती घरी जावं लागेल, याची सोशल मीडियावर भविष्यवाणी केली जात आहे. या भविष्यवाणीनुसार बिग बॉस 16 च्या विजेतेपदी चर्चेतलं नाव असल्याचं समोर येत आहे.

कोण ठरणार विजेता?

बिग बॉस शोविषयी बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘द खबरी’ने त्यांच्या भविष्यवाणीत प्रियांका चहर चौधरीला विजेती ठरवलं आहे. टेलिव्हजनची संस्कारी सून पुन्हा एकदा बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार असल्याचं दिसतंय. या भविष्यवाणीनुसार शिव ठाकरेचं विजेता होण्याचं स्वप्न तुटणार आहे. तो फर्स्ट रनरअप बनू शकतो. तर दुसरा रनरअप रॅपर एमसी स्टॅन बनणार असल्याचा अंदाज आहे. चौथ्या क्रमांकावर अर्चना गौतम तर शालीन आणि निमृत हे अंतिम स्थानी येऊ शकतात.

कोणामध्ये रंगली चुरस?

सध्या बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रियांका आणि शिव यांच्यात चुरस रंगली आहे. या दोघांचे चाहते त्यांना प्रचंड पाठिंबा देत आहेत. यंदाच्या सिझनची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी हा शो काही दिवसांनी वाढवला आहे. मात्र सूत्रसंचालक सलमान खानच्या हाती काही दुसरे प्रोजेक्ट असल्याने वीकेंड का वारचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहर करत आहे.

हे सुद्धा वाचा

नुकतेच या शोमधून सुंबुल तौकिर खान आणि टीना दत्ता हे दोन स्पर्धक बाहेर पडले. सध्या बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम, शालीन भनोट आणि निमृत कौर आहलुवालिया हे स्पर्धक राहिले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.