Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार? देवोलीना भट्टाचार्जीने उचलला पडदा

आता अर्चना गौतम, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोट आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका आणि शिव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Bigg Boss 16 | बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार? देवोलीना भट्टाचार्जीने उचलला पडदा
बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार? देवोलीना भट्टाचार्जीने उचलला पडदाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 7:04 PM

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन अवघ्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. हा शो ग्रँड फिनालेच्या जवळ येऊन पोहोचला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातून निमृत कौर आहलुवालियाला बाहेर पडावं लागलं. तिच्या एलिमिनेशननंतर बिग बॉसला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. आता अर्चना गौतम, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोट आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका आणि शिव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या दोघांपैकी कोणीतरी एक बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांदरम्यान आता टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने विजेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.

देवोलीनाने सांगितलं विजेत्याचं नाव

बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले येत्या 12 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हा शो संपण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या काही माजी स्पर्धकांनी त्यांच्या अनुभवावरून विजेत्याच्या नावाची भविष्यवाणी केली आहे. काहींनी शिवचं नाव घेतलं तर काहींनी अर्चना गौतमचं नाव सुचवलं. त्यादरम्यान आता बिग बॉस 13 ची स्पर्धक देवोलीन भट्टाचार्जीनेही तिचे विचार मांडले आहेत.

हे सुद्धा वाचा

देवोलीनाने ट्विट करत लिहिलं, ‘काहीही करा, जिंकणार तर प्रियांका चहर चौधरीच. मी खूप आधीच बिग बॉस हा शो पाहणं बंद केलं. मात्र बिग बॉस 16 च्या पहिल्या आठवड्यातच मला अंदाज आला होता. तीन वर्षांचा अनुभव जो आहे मला.’

देवोलीनानंतर बिग बॉसच्या आणखी एक माजी स्पर्धकाने ट्विट केलं आहे. बिग बॉस 7 ची स्पर्धक काम्या पंजाबीने लिहिलं की इतिहासाची पुनरावृत्ती होईल. काम्याच्या या ट्विटवरून नेटकरी शिव ठाकरेचा अंदाज वर्तवत आहेत. कारण शिवने बिग बॉस मराठी 2 चं विजेतेपद जिंकलं होतं.

बिग बॉस 16 च्या विजेत्याला बक्षिस म्हणून 21 लाख 80 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचसोबत सिल्वर आणि गोल्डन रंगाची युनिकॉर्न डिझाइनची ट्रॉफी मिळणार आहे.

ट्रॉफीची पहिली झलक

बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची पहिली झलकसुद्धा दाखवण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये बिग बॉसची ट्रॉफी दाखवण्यात आली आहे. यंदाच्या सिझनची ट्रॉफी ही आतापर्यंतच्या सर्व सिझनपेक्षा अत्यंत वेगळी आणि खास आहे. या ट्रॉफीमध्ये युनिकॉर्न बनवण्यात आला आहे आणि तो सिल्वर-गोल्ड कलरमध्ये पहायला मिळतोय. बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची डिझाइन Feminine असल्याने महिला हा शो जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.