तुला कशामुळे मुलगी भेटली ते माहितीये.. अंकिताच्या पतीचं कडाक्याचं भांडण; थेट बिग बॉसच्या घराबाहेर जाणार?

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि टीव्ही अभिनेता अभिषेक कुमार यांच्या बिग बॉसच्या घरामध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. या भांडणादरम्यान अभिषेक विकीला असं काही म्हणाला, जे ऐकल्यानंतर अंकिता आणि विकी दोघांचाही राग अनावर झाला.

तुला कशामुळे मुलगी भेटली ते माहितीये.. अंकिताच्या पतीचं कडाक्याचं भांडण; थेट बिग बॉसच्या घराबाहेर जाणार?
Vicky Jain in Bigg Boss 17Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 12:56 PM

मुंबई : 19 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतो. कधी कोणाचा रोमान्स तर कधी कोणाची भांडणं.. स्पर्धकांमध्ये दररोज बदलणारी ही समीकरणं पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असतात. इतके दिवस एकाच बंद घरात राहिल्यानंतर स्पर्धकांच्या संयमाचा बांध सुटणं स्वाभाविक आहे. असंच काहीसं अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि टीव्ही अभिनेता अभिषेक कुमार यांच्याबाबत घडलंय. शोच्या सुरुवातीला एकमेकांसोबत राहणारे आणि एकमेकांची साथ देणारे विकी आणि अभिषेक यांच्यात आता खटके उडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये छोटा वाद झाला होता. आता मात्र अभिषेक आणि विकी हे एकमेकांशी जोरदार भिडले आहेत.

बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक आणि विकी यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचं पहायला मिळत आहे. या भांडणादरम्यान अभिषेक ओरडून विकीला म्हणतो, “40 वर्षांचा म्हातारा.. स्वत:कडे बघ जरा.” वयावरून केलेली टिप्पणी विकीला अजिबात आवडत नाही. तो अभिषेकच्या खासगी आयुष्यावरून त्याला डिवचतो. “तू स्वत:कडे आधी लक्ष दे, तुझ्या बाजूने एकही मुलगी नाही,” असं विकी सुनावतो. तेव्हा अभिषेक विकीला म्हणतो, “काही फरक पडत नाही.. आणि तुलासुद्धा मुलगी कशामुळे भेटली हे मला चांगलंच माहित आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

अभिषेक आणि विकीच्या भांडणादरम्यान बाजूलाच उभी असलेली अंकिता हे ऐकून भडकते. ती जोरजोरात ओरडून अभिषेकला सवाल करते, “कोणत्या कारणामुळे भेटली मुलगी.. सांग ना.” अंकिता आणि अभिषेक यांच्या वादावादीदरम्यान विकी त्याला धक्का देतो. विकीच्या धक्क्याने अभिषेक खुर्चीवर पडतो. नंतर उठून तोसुद्धा विकीला धक्का देतो. हा प्रोमो पाहिल्यानंतर बिग बॉसच्या घरात तुफान भांडणं झाल्याचा अंदाज येतोय. स्पर्धकांनी एकमेकांवर हात उचलला तर त्यांच्यावर अनेकदा थेट घराबाहेर जाण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता या भांडणानंतर विकी जैन आणि अभिषेक कुमार यांच्यावर बिग बॉसकडून कोणती कारवाई होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.