AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे-विकी जैनचं लग्न धोक्यात? टीव्हीवर नात्याची पोलखोल, पती म्हणाला “3 वर्षांपासून..”

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात कडाक्याचं भांडण झालं आहे. जेवणावरून सुरू झालेल्या या वादादरम्यान विकीने अंकिताची पोलखोल केली. या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी विकीवर टीका केली आहे.

अंकिता लोखंडे-विकी जैनचं लग्न धोक्यात? टीव्हीवर नात्याची पोलखोल, पती म्हणाला 3 वर्षांपासून..
Ankita Lokhande and Vicky Jain Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 9:23 AM

मुंबई : 12 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू पहायला मिळतेय. या दोघांमध्ये अनेकदा क्षुल्लक कारणांवरून भांडणं झाली आहेत. मात्र प्रत्येक भांडणादरम्यान विकी ज्या पद्धतीने अंकिताशी बोलतो, त्यावरून नेटकरी खूप नाराज आहेत. आता बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा अंकिता आणि विकी यांच्यात भांडणं झालं आहे. अंकिताने किचनमध्ये चपात्या करायला गेली, तेव्हा या वादाची सुरुवात झाली. विकीने तिला सांगितलं, “चपात्या छोट्या छोट्या आणि जास्त संख्येने कर, जेणेकरून जेवण सर्वांना पुरू शकेल.” त्यावर अंकिताला त्याला म्हणते, “माझ्याकडे जेवढं पीठ आहे, त्यातून मी जितक्या बनवता येतील तितक्या बनवेन.” इथूनच या वादाला सुरुवात झाली.

“तुला माझं ऐकायचंच नाहीये ना, तू हे सकारात्मरित्या घेत नाहीयेस. आम्हालासुद्धा जेवणाची गरज आहे”, असं विकी अंकिताला सुनावतो. हे ऐकल्यानंतर अंकिता त्याला चिडून म्हणते, “तुला जेवण मिळतंय ना, तू खातच तर आहेस.” जेवणावरून बोलल्याने विकीचा पारा चढतो. “बिग बॉसनंतर आयुष्य आहे की नाही”, असा सवाल तो अंकिताला करतो. त्यावर अंकिताही त्याला प्रत्युत्तर देते. “त्याचा तू विचार कर. तू काहीही बोलू शकतोस ना?”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Biggboss17 (@reality_showz)

यानंतर अंकिता विकीसाठी जेवण बनवत असताना खानजादी तिला सतत सूचना देत असते. खानजादीच्या सततच्या सूचनांमुळे अंकिता वैतागते आणि तिलाच जेवण बनवण्याचा सल्ला देते. या दोघींच्या भांडणात पुन्हा एकदा विकी मध्ये येतो आणि खानजादीला जेवण बनवण्यास सांगतो. विकीने खानजादीकडे जेवणाची जबाबदारी सोपवल्याने अंकिता खूप नाराज होते आणि त्याला म्हणते, “तुला माझ्या हाताने बनवलेलं जेवण जेवायचं नाहीये.” हे ऐकल्यानंतर विकी चिडून अंकिताला म्हणतो, “गेल्या तीन वर्षांत तू काय बनवलंस?” या भांडणादरम्यान अंकिताला अश्रू अनावर होतात.

“100 लोक पाहतायत आणि हे ऐकतायत. तरीसुद्धा तू सतत माझा अनादर करतेस”, अशा शब्दांत विकी तिच्यावर भडकतो. त्यावर अंकिता म्हणते, “मी तुझ्याशी आदरानेच बोलतेय.” मात्र तिचं काहीच ऐकण्यास विकी तयार नसल्याने अंकिता ढसाढसा रडू लागते. बिग बॉसच्या घरात याआधीही दोघांमध्ये खूप भांडणं झाली आहेत. यावरून नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.