Bigg Boss 17 मध्ये प्रँक करणं विकी जैनला पडलं महागात; बिग बॉसकडून ओरडा, पत्नी अंकिताही नाराज
बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सर्वाधिक चर्चेत आहेत. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अंकिताचा पती विकीने असं काही केलंय, ज्यामुळे त्याला बिग बॉसकडूनही ओरडा मिळाला आणि पत्नी अंकितासुद्धा त्याच्यावर नाराज झाली.
मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ हा नुकताच सुरू आहे. 15 ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला आणि त्यात सहभागी झालेल्या 17 स्पर्धकांच्या चेहऱ्यावर पडदा उचलण्यात आला. अगदी पहिल्या एपिसोडपासूनच हा शो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बिग बॉसचं घर यंदा तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागलं गेलं आहे. यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय. मात्र या शोमध्ये नुकतंच असं काही घडलं, ज्यामुळे अंकिता तिचा पती विकीवर नाराज झाली आहे.
नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक आपापल्या खोलीत गेल्यानंतर विकी जैन, रिंकू धवन आणि इतर काही स्पर्धक मिळून एक प्रँक करण्याचा विचार करतात. ते सर्व स्पर्धकांना एकत्र बोलावतात आणि सांगतात की, “बिग बॉसने एक डिमांड केली आहे. त्यांनी सर्व स्पर्धकांना बेड बदलण्यासाठी दोन मिनिटं दिली आहेत.” हे ऐकल्यानंतर सर्व स्पर्धक आपापला बेड निवडू लागतात. काही वेळानंतर इतर स्पर्धकांना हे समजतं की विकी प्रँक करत होता. बिग बॉसने अशी कोणती घोषणा केलीच नव्हती.
View this post on Instagram
हे सर्व घडल्यानंतर प्रँक केल्यामुळे बिग बॉस विकीला ओरडतो. “विकी भैय्या, डोकं चालवायची इतकी हौस असेल तर तू अंकिताच्या मागे मागे रुम नंबर 1 मध्ये का गेलास? कदाचित तुला नॅशनल टीव्हीवर हे दाखवायचं असेल की मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो”, अशा शब्दांत बिग बॉस सुनावतो. हे अंकिताला अजिबात आवडत नाही आणि ती विकीवर नाराज होते.
15 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धकांची एण्ट्री झाली. या स्पर्धकांना घरात एकत्र राहून अद्याप 24 ताससुद्धा झाले नाहीत आणि त्यांच्यात आपापसांत भांडणं सुरू झाली आहेत. सर्वांत आधी प्रेक्षकांना इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील कडाक्याचं भांडण पहायला मिळालं. त्यानंतर पती विकी जैनच्या एका वक्तव्यावरून अंकिता लोखंडेनं थेट त्याला चप्पल फेकून मारली. या एपिसोडचा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला होता.