विकी जैनच्या टकलेपणाची खिल्ली उडवताच भडकली अंकिता लोखंडे; म्हणाली..

'बिग बॉस 17'च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला खास सुविधा मिळत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी इतर स्पर्धकांनी केली होती. तेव्हा नील भट्टने विकीच्या केसांबद्दल मोठा खुलासा केला होता. आता त्यावरूनच अरुण माशेट्टीने विकीची खिल्ली उडवली.

विकी जैनच्या टकलेपणाची खिल्ली उडवताच भडकली अंकिता लोखंडे; म्हणाली..
अरुण माशेट्टी, विकी जैन, अंकिता लोखंडेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 9:03 AM

मुंबई : 11 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये दररोज प्रेक्षकांना एक नवीन ड्रामा पहायला मिळतो. आतापर्यंत या शोमधून काही स्पर्धक बाद झाले आहेत. तर घरातील स्पर्धकांमध्ये सतत भांडणं होताना दिसतंय. या भांडणादरम्यान काही स्पर्धकांचा स्वत:वरील ताबा सुटतो तर काही स्पर्धक एकमेकांविरोधात वैयक्तिक टिप्पणी करतात. असंच काहीसं अरुण माशेट्टीने विकी जैनबद्दल म्हटलंय. यानंतर विकीची पत्नी आणि प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे त्याच्यावर जोरदार भडकली. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये अरुण आणि अंकिता यांचं भांडण पहायला मिळत आहे.

अरुण विकीजवळ जाऊन ड्युटीबद्दल काही विचारत असतो. त्याचं उत्तर देताना विकी त्याला म्हणतो, “सुट्टीचा दिवस आहे.” यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. अरुण विकीला ‘पलटू’ असं म्हणतो आणि विकीसुद्धा त्याला ‘चुगलीखोर’ असं चिडवतो. हा वाद इथेच थांबत नाही. तर पुढे अरुण पुन्हा विकीला म्हणतो, “जो दिमाग से पैदल है..” याचं उत्तर देताना विकी म्हणतो, “मेरा दिमाग चल रहा है और ये पैदल चल रहा है.” यानंतर विकी अंकिताकडून टोपी घेऊन ती डोक्यावर घालत असतो. हे पाहून अरुण त्याला चिडवतो, “पुन्हा स्पेशल सर्व्हिसची वेळ झाली आहे वाटतं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अरुणच्या या वैयक्तिक कमेंटवर विकीची पत्नी अंकिता चांगलीच भडकली. ती अरुणला ओरडत म्हणते, “तुम्ही अशा वैयक्तिक गोष्टींवरून टिप्पणी करू शकत नाही. तुम्ही उद्धटपणा करू नका. तुम्ही बॉडीशेमिंग करत आहात.” काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात नील भट्टने विकी जैनला टक्कल असल्याचा खुलासा केला होता. “विकीला हेअरलाइन आणि टक्कलची समस्या आहे. त्याला विगची गरज लागते. दर दोन आठवड्यांनी तो मेडिकल ग्लूने विग चिटकवत असतो. त्यामुळे त्याने आधीच करारात त्याने ही गोष्ट लिहिली असेल. म्हणूनच बिग बॉसकडून त्याला विशेष सेवा मिळतेय”, असं त्याने इतर स्पर्धकांना सांगितलं होतं.

बिग बॉसनेही नंतर घरातील इतर स्पर्धकांना हे स्पष्ट केलं होतं की कास्टिंगच्या वेळीच अंकिता आणि विकीने ही खास मागणी केली होती. बिग बॉसच्या घरात त्यांना केसांसाठी विशेष सेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. बिग बॉसने स्पष्ट केलं की, “जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की त्यांची ही डिमांड त्यांच्यावर भारी पडेल तेव्हा ते म्हणाले, “आम्ही सांभाळून घेऊ.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.