Bigg Boss 17 साठी प्रियांका चोप्राच्या बहिणीला मोठी रक्कम; अंकिता लोखंडेला टाकलं मागे

बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यंदाच्या सिझनमध्ये बरेच नामांकित चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यापैकी अंकिता लोखंडे सर्वाधित चर्चेत आहे. म्हणून तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वाधिक मानधन दिल्याची चर्चा होती.

Bigg Boss 17 साठी प्रियांका चोप्राच्या बहिणीला मोठी रक्कम; अंकिता लोखंडेला टाकलं मागे
Mannara Chopra, Ankita Lokhande and Aishwarya Sharma Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 1:39 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींसोबतच युट्यूबर्ससुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरातील वातावरण चर्चेत राहिलं आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या सर्व 17 स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडेची लोकप्रियता अधिक असल्याने तिला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अंकिताला बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणीने मागे टाकलं आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांना किती मानधन मिळतंय, ते जाणून घेऊयात..

बिग बॉसच्या स्पर्धकांचं मानधन

बिग बॉससाठी मन्नारा चोप्रा ही अंकितापेक्षा जास्त मानधन स्वीकारतेय. तिला एका आठवड्यासाठी 15 लाख रुपये मिळत आहेत. अंकिताच्या मानधनापेक्षा ही रक्कम तीन लाखांनी जास्त आहे. अंकिता ही बिग बॉसमधील दुसरी सर्वांत महागडी स्पर्धक ठरली आहे. एका आठवड्यासाठी तिला 12 लाख रुपये फी मिळतेय. तर तिचा पती विकी जैनला एका आठवड्यासाठी 5 लाख रुपये दिले जात आहेत.

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे बिग बॉसमध्ये विशेष चर्चेत आहेत. ऐश्वर्याचीही प्रचंड लोकप्रियता आहे. याआधी तिने खतरों के खिलाडी या शोमधूनही विशेष छाप सोडली होती. आता बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तिला 12 लाख रुपये आणि पती नील भट्टला 7 लाख रुपये फी मिळत आहे. माजी क्राइम रिपोर्टर जिग्ना वोराला बिग बॉससाठी 7 लाख रुपये दिले जात आहेत. तर युट्यूबर अनुराग डोबाल याला साडेसात लाख रुपये मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

कॉमेडियन मुनव्वर फारुखीला सात लाख रुपये फी मिळत आहे. तर एक्स कपल ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारसुद्धा पहिल्या एपिसोडपासून चर्चेत आहेत. ईशाला तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकपेक्षा जास्त मानधन मिळतंय. तिला एका आठवड्यासाठी 7 लाख रुपये आणि अभिषेकला 5 लाख रुपये मिळत आहेत. टीव्हीवर प्रसिद्ध चेहरा रिंकू धवनला वकील सना रईस खानपेक्षा कमी मानधन मिळतंय. रिंकूला एका आठवड्यासाठी 4 लाख आणि सनाला 6 लाख रुपये दिले जात आहेत.

इतर स्पर्धकांचं मानधन-

सोनिया बंसल- एका आठवड्याला 7 लाख रुपये नावेद- एका आठवड्याला 4 लाख रुपये फिरोजा खान- एका आठवड्याला 3 लाख रुपये सनी आर्या- एका आठवड्याला 3.5 लाख रुपये अरुण मैशेट्टी- एका आठवड्याला 2 ते 4 लाख रुपये

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.