Bigg Boss 17 : ‘समर्थचा दबाव असल्यामुळे…’, इंटिमेट सीनवर ईशा मालवीय हिचा धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' मधून बाहेर आल्यानंतर ईशा मालवीय हिचा मोठा खुलासा, समर्थ जुरेल याच्यासोबत इंटिमेट सीनवर ईशा हिच्याकडून धक्कादायक वक्तव्य... सध्या सर्वत्र ईशा हिच्या वक्तव्याची चर्चा...

Bigg Boss 17 : 'समर्थचा दबाव असल्यामुळे...', इंटिमेट सीनवर ईशा मालवीय हिचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 12:18 PM

मुंबई | 26 जानेवारी 2024 : बिग बॉस 17 (Bigg Boss 17) शोचा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. ‘बिग बॉस 17’ शोची ट्रॉफी कोणता स्पर्धत जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकताच अभिनेत्री ईशा मालवीय ‘बिग बॉस 17’च्या घरातून बाहेर आली. सांगायचं झालं तर, बिग बॉसमध्ये आणि बाहेर देखील सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घरातील समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांचे खासगी व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. यावर ईशा हिने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एता मुलाखतीत ईशा हिने समर्थ याच्यासोबत व्हायरल झालेल्या इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला पश्चाताप आहे… मला तेव्हा काहीही कळत नव्हतं… मी फक्त प्रवाहासोबत गेली. मी बिग बॉसच्या घरात काही चुका केल्या असतील, तर त्या घरात खूप काही शिकली देखील आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे ईशा हिला, ‘समर्थ तुझ्यावर दबाव टाकत असल्यामुळे तू असं केलं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ईशा हिने होकार दिला आणि म्हणाली, ‘मी समर्थ याला सांगितलं तेव्हा त्याला वाईट वाटलं… त्यानंतर मी विचार केला आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि प्रेमात तर या गोष्टी येतात…’

‘समर्थ याच्यासोबत प्रेमात असल्यामुळे मी फार विचार केला नाही. टीव्हीवर काय चूक आणि काय योग्य वाटत आहे.. याचा देखील विचार मी केला नाही. शोमधील छोट्या गोष्टीवर गोंधळ उडायचा ही तर फार मोठी गोष्ट आहे..’ असं देखील ईशा म्हणाली.

समर्थ याच्यासोबत लग्नावर ईशा हिचं मोठं वक्तव्य

ईशा आणि समर्थ दोघे त्यांच्या नात्याचा पुढे काही विचार करणार असतील तर मी त्यांच्यासोबत आहे… असं वक्तव्य समर्थ याच्या वडिलांनी केलं होतं… यावर ईशा म्हणाली, ‘मला सध्या फक्त आणि फक्त माझ्या करियरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. आता माझा लग्नाबद्दल काहीही विचार नाही. पण आम्ही रिलेशनशिपला पुढे नेऊ…’ आता लवकरच बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. चाहते देखील ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.