ही अशी कशी ट्रॉफी? ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेआधी कलर्स टीव्हीने ट्रॉफीची झलक दाखवली आहे. ही ट्रॉफी काहींना हटके वाटली, तर काहींना ती अजिबात आवडली नाही. आज (रविवारी) संध्याकाळी 6 वाजल्यापासून बिग बॉसचा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगली आहे.

ही अशी कशी ट्रॉफी? 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Bigg Boss 17 trophyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 10:36 AM

मुंबई : 28 जानेवारी 2024 | 17 स्पर्धकांसोबत सुरू झालेल्या ‘बिग बॉस 17’ या लोकप्रिय शोचा प्रवास आज (रविवारी) संपुष्टात येणार आहे. जवळपास 105 दिवसांनंतर या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांचा समावेश आहे. आज विजेत्याच्या चेहऱ्यावरून पडदा उचलण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी ‘बिग बॉस 17’च्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. यंदाचा सिझन दिल, दिमाग आणि दम या थीमवर आधारित होता आणि त्याच थीमला अनुसरून बिग बॉसचं घर डिझाइन करण्यात आलं होतं. आता ट्रॉफीवरही हीच थीम पहायला मिळतेय.

बिग बॉसची ट्रॉफी नेहमीच चमकणारी असते, मात्र यावेळी ट्रॉफीचा लूक अत्यंत वेगळा पहायला मिळतोय. शोच्या प्रोमोमध्ये या ट्रॉफीची झलक दाखवण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या ट्रॉफीच्या लूकवरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींना ही ट्रॉफी एकदम हटके वाटली, तर काहींना ती अजिबात आवडली नाही. ‘बिग बॉसकडे पैसे संपलेत का, ही अशी कशी ट्रॉफी’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा किल्ल्यासारखा दिसतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला बक्षिसाच्या रकमेसोबतच एक कार आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याला किंवा तिला दिली जाणार आहे. ह्युंडाई क्रेटा SUV ही कार विजेत्याला मिळणार आहे. सध्या वोटिंग ट्रेंड पाहता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अग्रस्थानी आहे. त्याच्यानंतर अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार आहेत. अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा हे दोघं सध्या बॉटम 2 मध्ये आहेत. ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्ही आणि जियो सिनेमावर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा फिनाले सुरू राहणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरात फिनालेची ग्रँड पार्टीसुद्धा होणार आहे.

‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. मात्र ही रक्कम अद्याप पूर्णपणे निश्चित करण्यात आली नाही. कारण प्रत्येकवेळी शोच्या ग्रँड फिनालेच्या आधी सुटकेसचा ट्विस्ट पहायला मिळतो. बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांना 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची ऑफर दिली जाते. हे पैसे घेऊन त्या स्पर्धकाला माघार घेता येते. त्यामुळे मूळ बक्षिसाची रक्कम कमी होऊ शकते.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.