सर्वाधिक TRP मिळवलेला ‘बिग बॉस’चा सिझन कोणता? आताच्या सिझनला किती पसंती?

'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले. आतापर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय सिझन कोणता ठरला, हे तुम्हाला माहीत आहे का? बिग बॉसच्या यंदाच्या सिझनला किती टीआरपी मिळतेय, तेही जाणून घ्या..

सर्वाधिक TRP मिळवलेला 'बिग बॉस'चा सिझन कोणता? आताच्या सिझनला किती पसंती?
बिग बॉसImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 7:33 PM

मुंबई : 15 जानेवारी 2024 | बिग बॉसचा कोणता सिझन तुमचा सर्वांत आवडता आहे? असा प्रश्न जर बिग बॉसच्या चाहत्यांना विचारलं तर अनेकजण ‘बिग बॉस 13’ असंच उत्तर देतील. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लामुळे हा सिझन तुफान गाजला होता. बिग बॉसच्या शोमधील आतापर्यंतचा सर्वांत लोकप्रिय स्पर्धक म्हणूनही सिद्धार्थचंच नाव घेतलं जातं. पण ‘बिग बॉस 17’मधील कोणता स्पर्धक तुम्हाला सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न विचारला तर त्यासाठी एक ठराविक उत्तर मिळणं कठीण आहे. ‘बिग बॉस 13’चा टीआरपीसुद्धा सर्वाधिक होता. बिग बॉसच्या गेल्या चार सिझन्सचा विचार केला तर ‘बिग बॉस 13’ हाच प्रेक्षकांना खूप आवडला, असं म्हणायला हरकत नाही.

यंदाच्या सिझनसाठीही बिग बॉसच्या निर्मात्यांनी काही नवीन प्रयोग करून पाहिले. यंदा दिल, दिमाग आणि दम अशा तीन भागांमध्ये घराचं विभाजन केलं. यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉस हा स्पर्धकांशी अधिकाधिक संवाद साधू लागला आणि स्पर्धकांचे टास्क कमी करण्यात आले. वोट्सचा विचार केला तर मुनव्वर फारुखी, अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडे हे तिघे तगडे स्पर्धक मानले जात आहेत.

‘बिग बॉस 13’ पासून ‘बिग बॉस 17’ पर्यंतची टीआरपीची यादी-

‘बिग बॉस 13’ पहिला एपिसोड- 2.8 रेटिंग ग्रँड फिनाले एपिसोड- 4.9 रेटिंग

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस 14’ पहिला एपिसोड- 2.2 रेटिंग ग्रँड फिनाले एपिसोड- 3.2 रेटिंग

‘बिग बॉस 15’ पहिला एपिसोड- 2.0 रेटिंग ग्रँड फिनाले एपिसोड- 1.9 रेटिंग

‘बिग बॉस 16’ पहिला एपिसोड- 1.3 रेटिंग ग्रँड फिनाले एपिसोड- 3.3 रेटिंग

‘बिग बॉस 17’ पहिला एपिसोड- 2.3 रेटिंग सध्याची रेटिंग- 2.0

पहिल्या एपिसोडच्या रेटिंगपासून ते ग्रँड फिनालेपर्यंत ‘बिग बॉस 13’लाच सर्वाधिक टीआरपी मिळाली आहे. जर आपण ‘बिग बॉस 16’ची तुलना ‘बिग बॉस 13’शी केली तर त्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये 53 टक्क्यांची घट पहायला मिळते. ‘बिग बॉस 13’नंतर प्रेक्षकांचा रस हळूहळू कमी होताना दिसतंय. किंबहुना मध्यंतरीच्या काळात ‘बिग बॉस ओटीटी 2’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा बिग बॉसकडे वळू लागले आहेत. म्हणूनच ‘बिग बॉस 17’ला सुरुवातीलाच 2.3 अशी चांगली रेटिंग मिळाली. ग्रँड फिनालेचा विचार केला तरी ‘बिग बॉस 13’च्या फिनालेचा टीआरपी हा सर्वाधिक 4.9 आहे. ‘बिग बॉस 13’ नंतर आता ‘बिग बॉस 17’लाच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.