‘बिग बॉस’चा विजेताच म्हणतोय ‘पुन्हा ते घर नको रे बाबा!’, जाणून घ्या नेमकं कारण काय?

‘बिग बॉस 8’चा विजेता असलेला अभिनेता गौतम गुलाटी (Gautam gulati) या दिवसांमध्ये बराच चर्चेत आला आहे. अलीकडेच तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटामध्ये दिसला आहे.

‘बिग बॉस’चा विजेताच म्हणतोय ‘पुन्हा ते घर नको रे बाबा!’, जाणून घ्या नेमकं कारण काय?
गौतम गुलाटी
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 2:35 PM

मुंबई : ‘बिग बॉस 8’चा विजेता असलेला अभिनेता गौतम गुलाटी (Gautam gulati) या दिवसांमध्ये बराच चर्चेत आला आहे. अलीकडेच तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटामध्ये दिसला आहे. या चित्रपटात गौतम एका ‘गिरगीट’चे पात्र साकारले होते. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसे, बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर गौतमला जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर त्याची फॅन फॉलोइंगही लक्षणीय वाढली आहे. गेल्या पर्वात म्हणजेच ‘बिग बॉस 14’मध्ये गौतमला हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत ‘तुफानी सिनियर’ म्हणून घरात प्रवेश करण्याची ऑफरही देण्यात आली होती, परंतु त्याने नकार दिला होता. आता गौतमने स्वत: याचे कारण सांगितले आहे (Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again).

झूमला दिलेल्या मुलाखतीत गौतमने सांगितले की, तो ‘बिग बॉस’च्या घरात आत जाणार नाही, कधीतरी पाहुणा म्हणून शोमध्ये जाईल. तो म्हणाला, ‘मी या शोचा एक भाग होतो याचा मला खूप आनंद आहे आणि लोक अजूनही माझी आठवण काढतात. मात्र, आता मी पुन्हा त्या शोमध्ये जाणार नाही, जर एखादे काम किंवा थीमनुसार पाहुणा म्हणून बोलावलं तर नक्की विचार करेन.’

गौतम म्हणाला की, तो आता कार्यक्रमात जाण्याच्या नियमांचे पालन करू शकणार नाही. कारण त्यानंतर त्याचे इतर उर्वरित प्रकल्प ठप्प होतील. मागील वर्षी, त्याला 2 आठवड्यांपर्यंत घरात राहण्यासाठी ऑफर करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे त्याला 14 दिवस अलगीकरणात राहून आणि नंतर शोमध्ये गेल्यानंतर तो कालावधी इतका वेळ द्यावा लागणार होता. तो म्हणतो, माझ्याकडे तितका वेळ नव्हता कारण मी शूटिंग करत होतो आणि मी ज्या प्रकल्पांवर काम करत होतो, त्यांना गमावू इच्छित नव्हतो (Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again).

कसा मिळाला ‘राधे’मध्ये रोल

‘गिरगिट’ची भूमिका त्याच्याकडे कशी आली, हे सांगताना गौतम म्हणतो, “सलमान सर नसते तर हे शक्य झाले नसते.” आम्ही एक दिवस अचानक भेटलो आणि त्यांनी मला मिठी मारली. त्यावेळी त्यांना वाटले की आपण एकत्र काम केले पाहिजे. जेव्हा त्यांनी मला विचारले की, आपण एखादे नकारात्मक पात्र साकारण्यास इच्छुक आहात का, हे ऐकल्यावर मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी त्यांना सांगितले की माझे सर्व आवडते नायकही खलनायक आहेत आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच्या टीमने मला बोलावले आणि मला या भूमिकेसाठी निवडले गेले. माझे कपडे, लूक, प्रशिक्षण या सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरू झाल्या आणि केशरचना बदलून थेट शूटिंग सुरू झाली. जेव्हा एखादा टॉप मेगास्टार आपल्या मदतीसाठी पुढे येतो आणि आपल्यावर विश्वास ठेवतो तेव्हा खूप अभिमान वाटतो.’

गौतमची भूमिका वाढवण्यात आली

गौतम म्हणाला, ‘काही सीन पाहिल्यानंतर माझे पात्र आणखी वाढवण्यात आले. मी शूटिंग संपवून घरी परत आलो आणि 10 दिवसांनी मला पुन्हा अधिक शूट करण्यासाठी बोलवले गेले, कारण सरांना वाटले की मी हे अधिक चांगले करू शकेन आणि ही माझी सर्वात मोठी कामगिरी आहे आणि त्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे.’

(Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again)

हेही वाचा :

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

RRR | ज्युनिअर एनटीआरचे बर्थडे सरप्राईज, पाहा ‘कोमाराम भीम’चा नवा जबरदस्त लूक

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.