38 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्यास सज्ज, ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्रीशी केला होता पहिला विवाह

सारा खानशी अलीने बिग बॉसच्या घरात लग्न केलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर दिलेल्या मुलाखतीत अलीने त्या लग्नाचा पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं होतं. आज मी जेव्हा त्या क्षणांचा विचार करतो, तेव्हा मला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं वाटतं, असं तो म्हणाला होता.

38 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्यास सज्ज, 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीशी केला होता पहिला विवाह
Ali Merchant and Sara KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 2:14 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोच्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक अली मर्चंट नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. ‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानशी त्याने बिग बॉसच्या घरात नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं. बिग बॉसच्या घरातील हे लग्न त्यावेळी जोरदार चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2011 मध्ये विभक्त झाल्यानंतर अलीने 2016 मध्ये अनमशी दुसरं लग्न केलं होतं. त्याचं हे दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. आता वयाच्या 38 व्या वर्षी अली तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे.

अली मर्चंटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो गर्लफ्रेंड अंदलीब जैदीला प्रपोज करताना दिसतोय. हे दोघं नुकतेच दुबईला फिरायला गेले होते. याच ट्रिपदरम्यान अलीने गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं. अलीचा हा रोमँटिक अंदाज पाहून अंदलीब भावूक होते. अलीच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या वर्षभरापासून अली आणि अंदलीब एकमेकांना डेट करत आहेत. अंदलीब ही हैदराबादमधील एक मॉडेल आहे. या दोघांच्या नात्याची सुरुवात सोशल मीडियाद्वारे झाली होती. त्यानंतर हैदराबादच्या एका फॅशन शोदरम्यान ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.

हे सुद्धा वाचा

अली मर्चंट हा अभिनेता आणि डीजेसुद्धा आहे. 2011 मध्ये त्याने बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात साराशी लग्न केल्याच्या काही महिन्यांनंतर लगेचच दोघांचा घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने सारा खानशी लग्न करण्याचा पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं होतं. “आज मी जेव्हा त्या क्षणांचा विचार करतो, तर मला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं वाटतं”, असं वक्तव्य अली मर्चंटने केलं होतं.

“ती सर्वांत मूर्खपणाची गोष्ट होती. त्या नात्यात एकमेकांविषयी समजुतदारपणा नव्हता, सामंजस्य नव्हतं. आम्ही एकमेकांविषयी नीट विचार न करताच लग्नबंधनात अडकलो होतो. शो संपल्यानंतर लगेचंच आम्हीसुद्धा विभक्त झालो. कारण लग्नाचा निर्णयच आम्ही खूप घाईत घेतला होता. 2011 याच वर्षी आम्ही घटस्फोट घेतला,” असं त्याने म्हटलं होतं.

घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर 2016 मध्ये अलीने अनम मर्चंटशी लग्न केलं. मात्र त्याचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्याने अनमलाही घटस्फोट दिला. दुसऱ्या लग्नाविषयी त्याने सांगितलं, “ते आमचं अरेज्ड मॅरेज होतं. या लग्नातसुद्धा एकमेकांच्या पसंत-नापसंतीविषयी बरेच मतभेद होते. त्याचवेळी मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो, मात्र आर्थिक समस्या वारंवार उद्भवत होत्या. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांच्या समंतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.”

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.