Swami Om | ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण!

‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Swami Om | ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण!
स्वामी ओम
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 2:20 PM

मुंबई :बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांचे निधन झाले आहे. काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 3 महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना देखील झाला होता त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. बिग बॉसच्या ‘सीझन 10’ मध्ये स्वामी ओम स्पर्धक म्हणून दिसले होते. कोरोना झाल्यावर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. याच अवस्थेत, काही काळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे अखेरचा श्वास घेतला (Bigg Boss EX Contestant Swami Om Passes away).

कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास होत, असल्याचे सांगितले जात होते यानंतर त्यांच्या अर्ध्या शरीरावर अर्धांगवायू झाला ज्यामुळे गेल्या 15 दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज (3 फेब्रुवारी) त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंतिम संस्कार आज दुपारी दीड वाजता दिल्लीतील निगम बोध घाटावर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोर्टाकडून मिळाला होता दिलासा

‘बिग बॉस’मधील चर्चित स्पर्धक स्वामी ओम यांच्यावर एका गंभीर विषयावर वक्तव्य केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑगस्ट 2017 रोजी दहा लाख रुपये दंड ठोठावला होता. वास्तविक, स्वामी ओम यांनी याचिकेत म्हटले होते की, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतांना सीजेआयकडून शिफारस का घेतली गेली? यानंतर जेव्हा हे प्रकरण सीजेआय खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आले, तेव्हा कोर्टाने म्हटले की हा पब्लिसिटी स्टंट आहे. परंतु यावर स्वामी ओम यांनी उत्तर दिले की त्यांनी आधीच ‘बिग बॉस’ च्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. या प्रकरणात, गेल्या वर्षी कोर्टाने त्यांना दिलासा देत, 10 लाख दंडाऐवजी 8 आठवड्यात 5 लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते.

चोरीचेही आरोप

‘बिग बॉस 10’ ने त्याला ‘कॉन्ट्रोव्हिएशनल गुरू’ असे नाव दिले होते. स्वामी ओमवर सायकल चोरी केल्याचाही आरोप होता. त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या आरोपाखाली अटक केली होती. ‘बिग बॉस 10’ संपल्यानंतर दिल्लीच्या इंटर स्टेट क्राइम ब्रँचने भजनपुरा भागातून त्यांना अटक केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. स्वामी ओम यांच्यावर चोरी करणे, हत्यारे बाळगणे आणि इतरांच्या घरात घुसणे, असे अनेक आरोप होते. त्यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

याशिवाय स्वामी ओम यांच्याकडेही शस्त्रे असल्याचा आरोप होता. त्यांच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट, टाडा आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओम यांचे धाकटे बंधू प्रमोद झा यांनी देखील लोधी कॉलनी, दिल्ली येथे एका सायकलच्या दुकानातून 3 लोकांसोबत मिळून 11 सायकली आणि मौल्यवान वस्तू व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप केला होता.

(Bigg Boss EX Contestant Swami Om Passes away)

हेही वाचा :

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.