AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फक्त स्पर्श तर करु दे…’, इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांना देखील करावी लागते तडजोड? अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा

Casting Couch : नव्या कलाकारांना कशी घाबरवते इंडस्ट्री? झगमगत्या विश्वाचं काळं सत्य, 'बिग बॉस' फेम अभिनेता म्हणाला, 'आता नाही तर, दोन - तीन वर्षांनंतर...', झगमगत्या विश्वातील मोठं सत्य आणखी एका अभिनेत्याने आणलं समोर...केला धक्कादायक खुलासा

'फक्त स्पर्श तर करु दे...', इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांना देखील करावी लागते तडजोड? अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 8:24 AM

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : ‘इंडस्ट्रीमध्ये तुला असं काम करावं लागेलच… इंडस्ट्रीमध्ये सगळं असंच चालतं.. तू आता तडजोड करणार नाही, तर दोन – तीन वर्षांनंतर येशील तेव्हा…’ असा धक्कादायक बिग बॉस फेम अभिनेता अंकित गुप्ता याने केला आहे. सध्या सर्वत्र अंकित याने झगमगत्यातील विश्वातील सांगितलेल्या काळ्या सत्याची चर्चा सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये नवीन असताना अंकित याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला… एवढंच नाही तर, अभिनेता कास्टिंग काऊचच्या देखील जाळ्यात अडकला होता. अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्याने सत्य सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकित गुप्ता म्हणाला, ‘इंडस्ट्रीमध्ये मी प्रत्येक स्वभावाच्या व्यक्तींना भेटलो आहे. अशात लोकं तुम्हाला अनेक गोष्टींचं अमिष दाखवतात. लोकं तुम्हाला अनेकांची नावे सांगतात.. याचं करियर माझ्यामुळे झालं… मी त्याला मदत केली… त्यांच्या जाळ्यात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात.’

‘प्रत्येक जण म्हणतो अंकित तुला तडजोड तर करावीच लागेल. याठिकाणी सर्वकाही असंच होतं. तू आता नाही करणार तर, दोन – तीन वर्षांनंतर पुन्हा येशील आणि म्हणशील काय करायचं आहे करा… तुझे दोन – तीन वर्ष वाया जातील.’ असं म्हणत अंकित याने सर्वांसमोर आणखी एक खुलासा केला….

पुढे अंकित म्हणाला, ‘कॅमेऱ्यासमोर असं बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही… पण लोकं खाली बसतात आणि फक्त स्पर्श तर करु दे…’ असं देखील अभिनेता नुसताच झालेल्या मुलाखतीत म्हणाला. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या दिवसांत आलेल्या अडचणींबद्दल देखील सांगितलं.

अभिनेत्याने मुंबईत येवून करियरला सुरुवात केली तेव्हा, त्याला फक्त चार हजार रुपये मिळायचे. मायानगरीत राहाण्याचा खर्च फार आहे. म्हणून अंकित याने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय देखील घेतला होता. पण ‘बालिका वधू’ मालिकेत काम मिळाल्यानंतर अभिनेत्याच्या करियरला वेगळी दिशा मिळाली.

आज अंकित गुप्ता टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘उडारिया’ आणि ‘बिग बॉस’ मुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अंकित फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो.