बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत अर्चना गौतमच्या भावाला नाकारली एण्ट्री; नेटकरी म्हणाले ‘असा अपमान आम्ही..’

दरवर्षी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या इफ्तार पार्टीला बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित राहतात. रविवारी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत अर्चना गौतमच्या भावाला नाकारली एण्ट्री; नेटकरी म्हणाले 'असा अपमान आम्ही..'
Archana GautamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 9:45 AM

मुंबई : रविवारी रात्री मुंबईत चित्रपट आणि टीव्ही कलाकारांची मोठी मैफल जमली होती. या कलाकारांना दरवर्षी बाबा सिद्दिकी इफ्तार पार्टीला आमंत्रित करतात. सलमान खानपासून शहनाज गिल, प्रिती झिंटा यांसारखे बरेच सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. या पार्टीतील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडीओ ‘बिग बॉस 16’ची माजी स्पर्धक अर्चना गौतमचा आहे. अर्चनाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण या इफ्तार पार्टीला तिच्यासोबत तिचा भाऊ गुलशन गौतमसुद्धा पोहोचला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेरच थांबवलं आणि आत जाण्याची परवानगी दिली नाही.

सोशल मीडियावर अर्चना गौतम आणि तिच्या भावाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना तिच्या भावासोबत पार्टीत जात असते, तितक्यात सुरक्षारक्षक तिच्या भावाला अडवतात. गुलशनला त्याचा आयडी दाखवण्यास सांगितलं जातं. त्यावर तो अर्चनासोबत असल्याचं दाखवतो. त्यानंतर अर्चना म्हणते, “हा माझ्यासोबतच आहे.” मात्र सुरक्षारक्षक त्याला आयडीशिवाय आत पाठवण्यास तयार नसतात. हे ऐकल्यानंतर अर्चना तिच्या भावाला तिथून जाण्यास सांगते आणि ती दुसऱ्या बाजूने आत जाते.

हे सुद्धा वाचा

अर्चनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जर मला कोणी बोललं असतं की तुझ्या भावाला परवानगी नाही, तर मी त्याला असं एकटं जाऊ दिलं नसतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘हिचा भाऊ बॉडीगार्ड आहे का? नेहमी तिच्या मागे-पुढे फिरत असतो’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘मी तर माझ्या भावासोबत त्या पार्टीतून निघून गेली असती, पण त्याला असं एकटं जाऊ दिलं नसतं’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली. भावाला सोडून अर्चना पार्टीत गेल्याने तिच्यावर अनेकांनी टीका केली.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

दरवर्षी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या इफ्तार पार्टीला बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित राहतात. रविवारी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सलमान खान, आयुष शर्मा, अर्पिता खान, पूजा हेगडे, नरगिस फाखरी, साजिद खान, उर्मिला मातोंडकर, जावेद जाफरी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, हुमा कुरेशी, इमरान हाश्मी यांनी हजेरी लावली होती.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.