Video | ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीचे खेसारीलाल यादवसोबत ठुमके, पाहा दोघांचा धमाल व्हिडीओ!

अभिनेता खेसारीलाल यादव हा भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार आहेत. त्यांचे गाणे कोणतेही नवे रिलीज होताच सुपरहिट होते. तर, हरयाणवी क्वीन सपना चौधरीसुद्धा सध्या तिच्या गाण्या आणि डान्स व्हिडींओमुळे चर्चेत आहे.

Video | ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीचे खेसारीलाल यादवसोबत ठुमके, पाहा दोघांचा धमाल व्हिडीओ!
सपना चौधरी आणि खेसारीलाल यादव
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 9:05 AM

मुंबई : ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, गायिका आणि नर्तक सपना चौधरी (Sapna Choudhary) तिच्या नवीन डान्स व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्याचबरोबर भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार खेसारीलाल यादव (Khesarilal Yadav) याने देखील आपल्या प्रत्येक शैलीने भोजपुरी रसिकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे आहे. अशा वेळी जेव्हा या दोघांनाही एकत्र धमाल करताना पाहणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानीच असते. सध्या या दोघांचा एक डान्स व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आला आहे (Bigg Boss Fame Sapna choudhary and Khesarilal yadav dance video goes viral).

फॅन पेजवर दिसला व्हिडीओ

‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी हिच्या फॅन पेजवर दिसत असलेल्या या व्हिडीओमध्ये सपनाच्या डान्स मुव्ह्स बघून चाहते कौतुक करताना थकत नाहीयत. गाणे हरयाणवी असो की, भोजपुरी सपना आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. सपना बरोबर या व्हिडीओमध्ये असणारा अभिनेता खेसारीलाल यादव आपले उत्कृष्ट नृत्य कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांचा हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, या गाण्यावर पाहणाऱ्याचे पाय देखील आपोआप थिरकू लागतात.

असा आहे सपनाचा लूक!

या व्हिडीओबद्दल बोलायचे, तर हा व्हिडीओ नवा नाही. 2019मध्ये हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. यात सपना चौधरी लांब केशरी सलवार सूटमध्ये दिसली आहे. त्याच्यासोबत खेसारीलालची शैलीही बरीच छान दिसत आहे. खेसारीची कॅप त्याचा गेटअप आणखी उठावदार बनवत आहे. या व्हिडीओत हे दोघेही खेसारीलाल याच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत (Bigg Boss Fame Sapna choudhary and Khesarilal yadav dance video goes viral).

भोजपुरी मनोरंजन विश्वातील सुपरस्टार!

अभिनेता खेसारीलाल यादव हा भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार आहेत. त्यांचे गाणे कोणतेही नवे रिलीज होताच सुपरहिट होते. तर, हरयाणवी क्वीन सपना चौधरीसुद्धा सध्या तिच्या गाण्या आणि डान्स व्हिडींओमुळे चर्चेत आहे. सपना नुकतीच राजकारणात दाखल झाली आणि तिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

हरयाणाची स्टार सपना चौधरीने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत होते, तेवढेच चकीतही झाले होते. कारण गुपचूप लग्न केल्यानंतर सपनाने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली होती. मात्र, इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नेंसी गुपित ठेवल्या होत्या. बाळाच्या जन्मानंतर सपनाने मनोरंजन विश्वातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. ‘बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याने सपना चौधरीला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

(Bigg Boss Fame Sapna choudhary and Khesarilal yadav dance video goes viral)

हेही वाचा :

Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

VIDEO : धर्मेंद्रसारखं नवऱ्याला कपाटाला बांधलं, इराणी महिलेचे शोले, ‘जब तक है जान’ गाण्यावर हेमा मालिनी स्टाईल डान्स

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.