AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या पत्नीच्या लग्नाबद्दल ऐकताच Shalin Bhanot हैराण, म्हणाला, ‘मी याबाबत काहीही बोलू…’

शालीन भोनट याच्या स्वभावामुळे दलजीत कौरने घेतला घटस्टोटाचा निर्णय; पहिली पत्नी दुसरं लग्न करत आहे हे कळात शालीन याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे...

पहिल्या पत्नीच्या लग्नाबद्दल ऐकताच Shalin Bhanot हैराण, म्हणाला, 'मी याबाबत काहीही बोलू...'
शालीन भनोट याच्या पहिल्या पत्नीने गुपचूप उरकला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 10:50 AM

Shalin Bhanot : टीव्ही अभिनेता शालीन भनोट (Shalin Bhanot) ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोच्या टॉप ५ पर्यंत पोहोचला पण विजयी होवू शकला नाही. पण आजही शालीन बिग बॉसच्या घरातील त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात शालीनमुळे देखील अनेक वाद रंगले, ज्यामुळे अभिनेता चर्चेत राहिला, तर दुसरीकडे लव्ह एन्गलमुळे देखील शालीन तुफान चर्चेत राहिला. टीना दत्त हिच्यासोबत शालीन भनोट याचं नाव जोडण्यात आलं. पण शालीन अत्यंत आक्रमक स्वभावाचा असल्याचं टीनाने बिग बॉसमध्ये सांगितलं. तर शालिन याची पहिली पत्नी दलजीत कौर हिने देखील अभिनेत्याचा स्वभाव आक्रमक असल्याचं सांगितलं. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दलजीत दुसरं लग्न करणार आहे.

एका मुलाखतीत शालीन याला पहिली पत्नी दलजीत कौर हिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्याने दिलेलं उत्तर हैराण करणारं आहे. शालीन म्हणाला, ‘मला काहीही ठावूक नाही… तर मी याबाबत काहीही बोलू शकत नाही… आता मी बाहेर आलो आहे, तर मला कळत आहे. सलमान खानच्या विकेंड का वारमध्ये याबद्दल काही बोलण्यात आलं होतं. पण मला काही माहिती. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की.. देव तिचं भलं करो…. ‘ असं शालीन म्हणाला.

शालीन याचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (dalljiet kaur) हिच्यासोबत केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या ६ वर्षांनंतर दलजीत आणि शालीन यांनी घटस्फोट घेतला. लग्नानंतर काही वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर दलजीत आणि शालीन यांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. आता पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर दलजीत दुसरं लग्न करणार आहे. तर शालीन याने आयुष्यभर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दलजीत कौर हिचं दुसरं लग्न…

गेल्या महिन्यात दलजीत कौर हिने निखिल पटेल यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरजीत आणि निखिल यांचा साखरपुडा नेपाळ याठिकाणी झाला आहे. लग्नानंतर दलजीत पती आणि मुलासोबत परदेशात शिफ्ट होणार आहे. पण मुलगा जेडन याला वडील शालीनला भेटण्यासाठी ती भारतात येणार असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र दलजीत आणि निखिल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.